7th Pay Commission | पगारवाढीसाठी येणार नवीन योजना! यापुढे या आधारे वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन...

Salary Hike : : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) आधारावर पगारातील बदलाचा लाभ मिळत आहे. अलीकडेच सरकारने महागाई भत्त्यात (Dearness allowance)वाढ करण्याची घोषणाही केली होती. तीन महिन्यांची थकबाकी आणि वेतन एप्रिलच्या पगारात येईल. मात्र याच दरम्यान बातम्या येत आहेत की 7व्या वेतन आयोगानंतर नवीन वेतन आयोग येणार नाही.

New System for Salary hike of Government employees
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी येणार नवीन सिस्टम 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) आधारावर पगार वाढीचा फायदा
  • अलीकडेच सरकारने महागाई भत्त्यातदेखील वाढ केली
  • समोर आलेल्या माहितीनुसार यापुढे वेतन आयोग नसणार

7th Pay Commission update : नवी दिल्ली  : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) आधारावर पगारातील बदलाचा लाभ मिळत आहे. अलीकडेच सरकारने महागाई भत्त्यात (Dearness allowance)वाढ करण्याची घोषणाही केली होती. तीन महिन्यांची थकबाकी आणि वेतन एप्रिलच्या पगारात येईल. मात्र याच दरम्यान बातम्या येत आहेत की 7व्या वेतन आयोगानंतर नवीन वेतन आयोग येणार नाही. (For salary hike government to introduce new system, there will be no more pay commission check details)

माजी अर्थमंत्र्यांनी दिले होते संकेत 

प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या बातमीनुसार, सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी नवीन फॉर्म्युला आणू शकते. जुलै 2016 मध्येच माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याचे संकेत दिले होते.

अधिक वाचा : Petrol Diesel Price Today | पेट्रोल स्वस्त झाले की महाग? पटापट चेक करा नवे दर

कामगिरीच्या जोरावर पगार वाढणार!

कर्मचाऱ्यांनी वेतन आयोगाच्या पलीकडे जाऊन विचार करावा, असे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत म्हटले होते. केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी कोणताही नवा वेतन आयोग असणार नाही, असे अर्थ मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या कामगिरीच्या आधारे वाढावे, अशी यंत्रणा सरकारकडून तयार करण्यात येत आहे.

अधिक वाचा : LPG Price Hike : एलपीजी गॅस सिलिंडर महागला, मे महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्वसामान्यांना महागाईचा झटका

सरकारकडून अधिकृत घोषणा नाही 

68 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 52 लाख पेन्शनधारकांसाठी अशी व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे की डीए 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर पगार आपोआप वाढेल. त्याला 'ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टीम' असे नाव देणे अपेक्षित आहे. याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

अधिक वाचा : Changes from 1st May | 1 मे पासून महागड्या सिलिंडरपासून बँकांच्या सुट्ट्यांमधील बदल; जाणून घ्या महिना कसा सुरू होईल

खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना लाभ

अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची इच्छा होती की, मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना तसेच खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी. या नवीन सूत्रामुळे कमी पगार आणि जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत कमी होणार आहे. खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.

किती फायदा होईल?

वेतन पातळी मॅट्रिक्स 1 ते 5 असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन किमान 21 हजारांच्या दरम्यान असू शकते. मोदी सरकार पुढील वेतन आयोगाच्या बाजूने नाही. वेतन आयोग दर 8-10 वर्षांनी लागू होतो. पण, यावेळी नवीन फॉर्म्युला 2024 मध्ये लागू केला जाऊ शकतो.

याआधीच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून त्यांना मोठा दिलास दिला आहे. कोरोना महामारीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि त्यातील वाढ काही काळ रोखण्यात आली होती. मात्र आता सरकारने यात दणदणीत वाढ दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगलीच वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी