Savings Account | बॅंक खात्यात आता किमान १०,००० रुपये ठेवावे लागणार, नाहीतर ६०० रुपयांचा दंड

Minimum Balance : बचत खात्यातील किमान बॅलन्स, नसल्यास आकारला जाणारा दंड, वाढलेले शुल्क याविषयीची माहिती पीएनबी बॅंकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. हे नवीन वाढीव शुल्क १५ जानेवारीपासून आकारले जाणार आहे. याआधी खातेधारकाला किमान ५,००० रुपयांची शिल्लक बॅंक खात्यात ठेवावी लागत होती. यापुढे मात्र खात्यात किमान १०,००० रुपयांची शिल्लक ठेवावी लागणार आहे. बचत खात्यातील शिल्लक १०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यास ६०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

Bank charges
बॅंकेच्या शुल्कात वाढ 
थोडं पण कामाचं
  • पीएनबी बॅंक खात्यात किमान १०,००० रुपयांची रक्कम आवश्यक
  • किमान बॅलन्स नसल्यास ६०० रुपयांचा दंड
  • लॉकर, चेक बाऊन्ससह इतरही शुल्कात बॅंकेकडून वाढ

Saving Account Balance: नवी दिल्ली : बॅंकेतील बचत खाते (Savings Account) सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे असते. पैसे जमा करण्यासाठी किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी, पैसे काढण्यासाठी बचत खात्याचा वापर केला जातो. काहीवेळा बचत खात्यात पैसे असतात तर काहीवेळा नसतात. मात्र आता बचत खात्यातील बॅलन्सबद्दल (Savings account balance)तुम्हाला सतर्क राहावे लागणार आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने (PNB)आपल्या सर्वच सेवांचे शुल्क वाढवले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत शहरातील खाते असल्यास आता खात्यावर किमान १०,००० रुपये शिल्लक ठेवावी लागणार आहे. आगामी काळात इतरही बॅंका पंजाब नॅशनल बॅंकेप्रमाणेच शुल्कवाढ करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य खातेधारकांना याचा भुर्दंड बसणार आहे. (For savings account you have to keep minimum balance of Rs 10,000, otherwise will be fined Rs 600)

पीएनबीचे वाढीव शुल्क

पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या ग्राहकांसाठी यासंदर्भातील सूचना जाहीर केली आहे. बचत खात्यातील किमान बॅलन्स, नसल्यास आकारला जाणारा दंड, वाढलेले शुल्क याविषयीची माहिती पीएनबी बॅंकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. हे नवीन वाढीव शुल्क १५ जानेवारीपासून आकारले जाणार आहे. याआधी खातेधारकाला किमान ५,००० रुपयांची शिल्लक बॅंक खात्यात ठेवावी लागत होती. यापुढे मात्र खात्यात किमान १०,००० रुपयांची शिल्लक ठेवावी लागणार आहे. बचत खात्यातील शिल्लक १०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यास ६०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. याआधी दंडाची रक्कम ३०० रुपये इतकी होती.

ग्रामीण बॅंक शाखेसाठीचे शुल्क

पीएनबीच्या ग्रामीण भागातील शाखेसाठी किमान शिल्लक १,००० रुपये ठेवावी लागणार आहे. तर आवश्यक शिल्लक नसल्यास ४०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ग्रामीण भागातील शाखेसाठी याआधी दंडाची रक्कम २०० रुपये होती. लॉकरच्या शुल्कादेखील वाढ करण्यात आली आहे. छोट्या लॉकरसाठी ग्रामीण भागासाठी १,००० रुपयांवरून वाढवून १,२५० रुपये करण्यात आले आहे. तर शहरी भागात छोट्या लॉकरसाठीचे शुल्क आता २,००० रुपये करण्यात आले आहे. आधी हेच शुल्क १,५०० रुपये इतके होते. मोठ्या लॉकरसाठी मात्र शहरी आणि ग्रामीण भाग दोन्हींसाठी १०,००० रुपये असणार आहे.

हफ्ता चुकल्यास लागणारा दंड

वेगवेगळे हफ्ते किंवा ईएमआय बचत खात्यातून दरमहा कापले जात असतात. जर हफ्ता चुकला किंवा खात्यात पुरेशी रक्कमच नसेल तर २५० रुपये दंड आकारला जाणार आहे. आधी १०० रुपये दंडापोटी आकारण्यात येत होते. एक लाखाच्या रकमेसाठीचा चेक बाऊन्स झाल्यास १५० रुपये आणि एक लाखावरील रकमेचा चेक बाऊन्स झाल्यास २५० रुपये दंडापोटी आकारले जाणार आहेत. 

बॅंकांच्या सुट्ट्या

जानेवारी २०२२ मध्ये जानेवारीमध्ये एकूण १६ दिवस बँक सुट्ट्या असतील. यातील ४ सुट्ट्या रविवारी, तर २ महिन्यांतील दुसरी सुट्टी शनिवारी आहे. यातील अनेक सुट्ट्या सातत्याने पडत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की देशभरात १६ दिवस बँका बंद राहणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत.

या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. पण आम्ही तुम्हाला सांगतो की या महिन्यात देशभरात एकाच वेळी 9 सुट्ट्या येणार आहेत. त्याच वेळी, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. तुम्हाला सांगतो की संपूर्ण महिन्याबद्दल बोलायचे झाले तर जानेवारीमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये 16 दिवस बँका बंद राहतील. आजकाल ग्राहक त्यांच्या संबंधित बँक शाखेत पैसे काढू किंवा जमा करू शकणार नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी