FORBES BILLIONAIRES LIST, 2 Indian businessmen among top 10 richest people in the world : जगातील सर्वाधिक श्रीमंत 10 जणांमध्ये 2 भारतीय उद्योगपती आहेत. ही आकडेवारी फोर्ब्सने प्रसिद्ध केली आहे.
गौतम अदानी हे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आणि भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. तसेच मुकेश अंबानी हे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आठव्या स्थानी आणि भारतातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.
गौतम अदानींची एकूण संपत्ती 137.5 बिलियन डॉलर तर मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 97.2 बिलियन डॉलर आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये टेस्ला, स्पेस एक्स आणि ट्विटरचे मालक अॅलन मस्क पहिल्या स्थानी आहेत. मस्कची एकूण संपत्ती 198.9 बिलियन डॉलर आहे.
जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 54व्या आणि भारतातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर शिव नाडर आहेत. त्यांची संपत्ती 26.2 बिलियन डॉलर आहे. कोविडवर प्रभावी लस तयार करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटचे सायरस पूनावाला जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 66व्या आणि भारतातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 22.3 बिलियन डॉलर आहे.
Gold Jewelley For Weedding : लग्न सोहळ्याला EMIवर खरेदी करू शकतात सोन्याचे दागिने
जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 86व्या आणि भारतातील श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी डी मार्टचे संस्थापक राधाकृष्णन दमाणी आहेत. त्यांची संपत्ती 18.2 बिलियन डॉलर आहे. जिंदाल उद्योग समुहाच्या सावित्री जिंदाल आणि फॅमिलीची एकूण संपत्ती 18 बिलियन डॉलर आहे. सावित्री जिंदाल भारतातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत 87व्या स्थानी आहेत.
जगात (Rank) | श्रीमंत व्यक्तीचे नाव | एकूण संपत्ती (Net Worth) |
1 | अॅलन मस्क | 198.9 बिलियन डॉलर |
2 | बर्नार्ड अरनॉल्ट अँड फॅमिली | 183.1 बिलियन डॉलर |
3 | गौतम अदानी | 137.5 बिलियन डॉलर |
4 | जेफ बेझोस | 118.8 बिलियन डॉलर |
5 | वॉरन बफे | 109.5 बिलियन डॉलर |
6 | लॅरी एरिसन | 108.2 बिलियन डॉलर |
7 | बिल गेट्स | 107.3 बिलियन डॉलर |
8 | मुकेश अंबानी | 97.2 बिलियन डॉलर |
9 | लॅरी पेज | 87.2 बिलियन डॉलर |
10 | कार्लोस स्लिम हेलू अँड फॅमिली | 85.7 बिलियन डॉलर |
जगात (Rank) | भारतात | श्रीमंत व्यक्तीचे नाव | एकूण संपत्ती (Net Worth) |
3 | 1 | गौतम अदानी | 137.5 बिलियन डॉलर |
8 | 2 | मुकेश अंबानी | 97.2 बिलियन डॉलर |
54 | 3 | शिव नाडर | 26.2 बिलियन डॉलर |
66 | 4 | सायरस पूनावाला | 22.3 बिलियन डॉलर |
86 | 5 | राधाकृष्णन दमाणी | 18.2 बिलियन डॉलर |
87 | 6 | सावित्री जिंदाल आणि फॅमिली | 18 बिलियन डॉलर |
100 | 7 | दिलीप संघवी | 16.8 बिलियन डॉलर |
101 | 8 | लक्ष्मी मित्तल | 16 बिलियन डॉलर |
103 | 9 | कुमार बिर्ला | 15.9 बिलियन डॉलर |
105 | 10 | सुनिल मित्तल अँड फॅमिली | 15.8 बिलियन डॉलर |