नवी दिल्ली: फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या यादीमध्ये जगभरातील पहिल्या दोन हजार कांपन्यांमध्ये भारतातील ५७ कंपन्यांना स्थान मिळाले आहे. तर पहिल्या २०० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज या एकमेव भारतीय कंपनीचा समावेश झाला आहे. प्रतिष्ठेच्या फोर्ब्स मासिकाने ही यादी जाहीर केली आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. फोर्ब्सच्या २०१९च्या पहिल्या २००० कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर चीनची इंडस्ट्रियल एन्ड कमर्शिअल बँक ऑफ चायना (आयसीबीसी) ही कंपनी आहे. विशेष म्हणजे सलग सातव्या वर्षी ही कंपनी फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहिली आहे.
भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी या यादीमध्ये ७१ व्या स्थानावर आहे. पेट्रोलियम आणि गॅस क्षेत्रात ही कंपनी जगात ११व्या क्रमांकावर आहे तर याच कॅटेगरीमध्ये रॉयल डच शेल ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या २०० कंपन्यांच्या यादीत स्थान पटकावणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही एकमेव भारतीय कंपनी आहे. उर्वरीत २००० कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक (२०९), ओएनजीसी (२२०) इंडियन ऑईल (२८८) तसेच एचडीएफसी लिमिटेड (३३२) यांचा समावेश आहे.
टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एलअँडटी, भारतीय स्टेट बंक आणि एनटीपीसी या कंपन्यांचा पहिल्या ५०० कंपन्यांमध्ये समावेश आहे. यासह जगातील २००० कंपन्यांच्या यादीत टाटा स्टील, कोल इंडिया, कोटक महिंद्रा बैंक, भारत पेट्रोलियम, इंफोसिस, अॅक्सिस बैंक, टाटा मोटर्स, आईटीसी, भारती एयरटेल, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, पावर ग्रीड, हिंडाल्को, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व, गेल, पंजाब नॅशनल बँक, ग्रासिम, बैंक ऑफ बडोदा, पॉवर फायनान्स आणि कॅनरा बँकेचा सामावेश आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या २ हजार कंपन्यांच्या यादीत भारतातील ६१ कंपन्यांचा समावेश आहे. या यादीत अमेरिकेतील सर्वाधिक ५७५ कंपन्यांचा तर त्या खालोखाल चीनच्या ३०९ कंपन्यांचा समावेश आहे. जपानच्या २२३ कंपन्या या यादीत समाविष्ट आहेत.
फोर्ब्स दर वर्षी जगभरातील श्रीमंतांची यादी जाहीर करतं. त्याचप्रमाणे जगातील बड्या कंपन्यांची यादीही जाहीर करते. ही यादी जाहीर करताना काही निकष लावण्यात आले आहेत. त्याचे अतिशय काटेकोर पालन केले जाते. यामध्ये कंपनीची विक्री, नफा, संपत्ती, तसेच शेअर बाजारात कंपनीच्या शेअरची असणारी किंमत यावरून कंपनीचे रँकिंग ठरवले जाते. यानुसार पहिल्या दहा कंपन्यांमध्ये इंडस्ट्रियल अॅन्ड कॉमर्शिअल बँक ऑफ चायना, जेपी मॉर्गन, चायना कंस्ट्रक्शन बँक, अॅग्रिकल्चर बैंक ऑफ चायना, बँक ऑफ अमेरिका, एपल, पिंग एन इन्शूरन्स ग्रुप, बँक ऑफ चायना, रॉयल डच शैल, वेल्स फार्गो या कंपन्यांचा समावेश आहे.