India Foreign Reserves | देशाचा परकी चलनसाठा वाढून ६४२ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर

India Foreign Reserves | भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परकी गंगाजळीचे महत्त्व मोठे आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया शेअर बाजारात येत असलेले पैसे आणि एफडीआय सातत्याने आपल्या कंटिजन्सी फंडमध्ये जमा करत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात परकी चलनसाठा भक्कम असणे आवश्यक आहे.

Foreign Reserves Rises
परकी चलनसाठ्या वाढ 
थोडं पण कामाचं
  • सरलेल्या आठवड्यात परकी चलनसाठा १.९१ अब्ज डॉलरची वाढ होत तो विक्रमी ६४२.०१ अब्ज डॉलरच्या पातळीवर
  • एफसीए १.३६ अब्ज डॉलरने वाढून ५७८.४६ अब्ज डॉलरवर
  • देशाचा सोन्याचा साठा ५७.२ कोटी डॉलरने वाढून ३९.०१ अब्ज डॉलरवर

India Foreign Reserves | मुंबई : भारताच्या परकी गंगाजळीत (India Foreign Reserves)२९ ऑक्टोबरला सरलेल्या आठवड्यात १.९१ अब्ज डॉलरची वाढ होत तो विक्रमी ६४२.०१ अब्ज डॉलरच्या पातळीवर पोचला आहे. सरलेल्या आठवड्यासाठी रिझर्व बॅंकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. सोन्याच्या मूल्यात झालेल्या वाढीमुळे परकी गंगाजळीत वाढ झाली आहे. मागील आठवड्यात परकी गंगाजळीत ९०.८ कोटी डॉलरची घट होत ती ६४०.१ अब्ज डॉलरवर आली होती. तर भारताच्या परदेशी चलनाच्या साठ्यात (एफसीए) (FCA)वाढ झाली आहे. एफसीए १.३६ अब्ज डॉलरने वाढून ५७८.४६ अब्ज डॉलरवर पोचला आहे. यात डॉलरबरोबरच युरो, पौंड आणि येनसारख्या चलनांचा समावेश असतो. मागील काही महिन्यांपासून देशाच्या परकी चलनसाठ्यात ( Foreign Reserves) सातत्याने वाढ होते आहे. (India's Foreign Reserves this week rose to record $642 Billion)

फॉरेन करन्सी अॅसेट्समध्ये झाली वाढ

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या आकडेवारीनुसार फॉरेन करन्सी अॅसेट्समध्येदेखील (एफसीए) वाढ झाली आहे. परकी गंगाजळीचा हा महत्त्वाचा घटक असतो. फॉरेन करन्सी अॅसेट्स १.३६  अब्ज डॉलरच्या वाढीसह ५७८.४६अब्ज डॉलरवर पोचला आहे. यामध्ये अमेरिकन डॉलरबरोबरच युरो, पौंड आणि येनसारख्या चलनांचा समावेश आहे. या चलनांमध्ये झालेली वृद्धी किंवा घसरण याचा परिणाम एफसीएवर होत असतो. परकी गंगाजळीमध्ये महत्वाच्या देशांच्या चलनाच्या साठ्याचा महत्वाचा हिस्सा असतो. यात अमेरिकन डॉलर हा महत्वाचा घटक असतो. अमेरिकेच्या चलना व्यतिरिक्त युरो, पौंड आणि येनचासुद्धा समावेश भारताच्या परकी चलनाच्या साठ्यात असतो. मागील वर्षी जून महिन्यात परकी चलनसाठा पहिल्यांदाच ५०० अब्ज डॉलरवर पोचला होता.

देशातील सोन्याचा साठा

याशिवाय परकी गंगाजळीमधील एक महत्वाचा घटक म्हणजे सोन्याचा साठा. सोन्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. देशाचा सोन्याचा साठा ५७.२ कोटी डॉलरने वाढून ३९.०१ अब्ज डॉलरवर पोचला आहे. सोन्याच्या मागणीत सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत ४७ टक्के वाढ दिसून आली. एकूण मागणी १३९.१० टन इतकी होती. सप्टेंबर २०२० मध्ये हाच आकडा ९४.६० टन इतका होता. आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

विशेष रेखांकन हक्क

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत असलेले विशेष रेखांकन हक्क १.७ कोटी डॉलर्सने वाढून १९.३० अब्ज डॉलरवर पोचले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर असलेले देशाचे राखीव हक्क १० लाख डॉलरने वाढून ५.२४ अब्ज डॉलरवर पोचले आहेत.

अर्थव्यवस्थेला परकी गंगाजळीचा आधार

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परकी गंगाजळीचे महत्त्व मोठे आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया शेअर बाजारात येत असलेले पैसे आणि एफडीआय सातत्याने आपल्या कंटिजन्सी फंडमध्ये जमा करत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात परकी चलनसाठा भक्कम असणे आवश्यक आहे. त्यामुळे देशाच्या क्रेडिट रेटिंगवर सकारात्मक परिणाम होईल. शिवाय यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदार अधिक प्रमाणात भारतात आकर्षित होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात गुंतवणुकदारांचे स्वागतच करण्यात येते आहे.

कोरोनामुळे उद्योग-धंद्यावर विपरित परिणाम झाल्याने मागील वर्षी निर्यात घटली होती. मात्र मागील तिमाहीपासून यात सुधारणा होते आहे. मागील वर्षी परकी चलनसाठ्याने विक्रमी पातळी गाठली होती. मात्र लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेने उचल खाल्ल्यानंतर परकी चलनसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी