Commodity Prices : फ्रीज, एसी, वॉशिंग मशीनच्या किंमती लवकरच कमी होणार...जागतिक बाजारात वस्तूंच्या किंमती घसरल्याचा परिणाम

Durables prices : तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्रीज (Fridge), एसी (AC)आणि वॉशिंग मशिनसारख्या (Washing Machine) गृहोपयोगी वस्तूंच्या किंमती लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. कारण जागतिक पातळीवर वस्तूंच्या (global commodity prices)किंमती कमी झाल्या आहेत आणि कंपन्या उत्पादन खर्चात घट झाल्याचा फायदा घेऊ पाहत आहेत. महागड्या कच्च्या मालामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे काही कंपन्यांनी अलीकडेच विविध उत्पादनांच्या किंमती वाढवल्या होत्या. मात्र आता ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

prices of Fridge, AC, and Washing Machine
फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशीनच्या किंमती घटणार 
थोडं पण कामाचं
  • फ्रीज (Fridge), एसी (AC)आणि वॉशिंग मशिनसारख्या (Washing Machine) गृहोपयोगी वस्तूंच्या किंमती घटणार
  • जागतिक पातळीवर उत्पादन खर्चात घट झाल्यामुळे वस्तू स्वत्त होण्याची शक्यता
  • कंपन्यांच्या मार्जिनमध्ये वाढ झाल्याचा फायदा ग्राहकांपर्यत पोचण्याची अपेक्षा

Fridge, AC, Washing Machine prices : नवी दिल्ली : तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्रीज (Fridge), एसी (AC)आणि वॉशिंग मशिनसारख्या (Washing Machine) गृहोपयोगी वस्तूंच्या किंमती लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. कारण जागतिक पातळीवर वस्तूंच्या (global commodity prices)किंमती कमी झाल्या आहेत आणि कंपन्या उत्पादन खर्चात घट झाल्याचा फायदा घेऊ पाहत आहेत. महागड्या कच्च्या मालामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे काही कंपन्यांनी अलीकडेच विविध उत्पादनांच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यामुळे फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशिनसारख्या गृहोपयोगी वस्तूंच्या किंमतीत मागील काळात वाढ झाली होती. त्याचा बोझा ग्राहकांच्या खिशावर पडत होता. मात्र आता गृहोपयोगी वस्तूंच्या किंमतीत घट होणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. (Fridge, AC, Washing Machine to become cheap as global input cost reduces)

अधिक वाचा : Bank of Baroda Update : महत्त्वाचे! बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी चेकसाठी लागू झाला नवा नियम...जर 'हे' केले नाही तर चेक अडकणार

मागील वर्षाच्या तुलनेत वस्तूंच्या किंमती घटणार

यावर्षी एप्रिलच्या तुलनेत तांब्याची किंमत 21 टक्क्यांनी आणि स्टीलची किंमत 19 टक्क्यांनी आणि अॅल्युमिनियमच्या किंमती 36 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. वस्तूंच्या किंमती घसरल्याने एकूण महागाई नियंत्रणातही मदत होईल.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा अंदाज

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्पादन खर्चा किंवा कच्च्या मालाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची शक्यता कमी झाली आहे. “आम्हाला विश्वास आहे की गेल्या दोन वर्षांत गृहोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांनी किंमती सातत्याने वाढवल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत एकत्रित किंमतीतील वाढ 20 टक्क्यांहून अधिक होती,” असे मत ICICI सिक्युरिटीजने मांडले आहे.

अधिक वाचा : Eucalyptus Farming : 'या' झाडाच्या शेतीतून करता येईल कोटींची कमाई, पाहा कशी करायची...

ICICI सिक्युरिटीजने पुढे असेही जोडले आहे की वाढलेल्या मार्जिनमुळे AC, रेफ्रिजरेटर्स, मायक्रोवेव्ह आणि वॉशिंग मशिनच्या निर्मात्यांना त्यांचा जाहिरातीवरील खर्च वाढवता येणार आहे आणि ग्राहकांना चांगल्या सवलती देता येणार आहेत. “आम्ही गृहोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांनी सर्व नफा खिशात घालण्याचे मॉडेल अपेक्षित नाही आणि त्यांच्याकडून नफा गुंतवण्याची अपेक्षा केली आहे,” असे पुढे ICICI अहवालात जोडले आहे.

रशिया -युक्रेन युद्धाचा परिणाम

फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू होताच, जागतिक अर्थव्यवस्था मागील काही दशकातील उच्चांकी पातळीवर पोचली त्याचबरोबर मंदावलेली वाढ, भू-राजकीय तणाव आणि निर्बंध यांच्या गर्तेत राहिली. मात्र जेव्हा कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किंमती कमी होऊ लागल्या तेव्हा परिस्थितीत सुधारणा झाली.

अधिक वाचा : SBI : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांनी लगेच अकाउंट चेक करा, बॅंकेने बंद केली असंख्य खाती, या खात्यातील व्यवहार थांबवले...

कोरोना महामारीच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यातच कोरोना महामारीतून जग सावरत असताना महागाईचे मोठे संकट जगासमोर उभे ठाकले आहे. अशात रशिया - युक्रेन युद्धामुळे जर मोठा आणीबाणीचाच प्रसंग निर्माण झाला आहे. आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हदेखील महागाईला आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवते आहे. जगभरात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिका देखील त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत कंपन्यांच्या उत्पादन खर्चात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा फटका ग्राहकांना बसतो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी