GST on Auto-rickshaw service | ई-कॉमर्सद्वारे ऑटोरिक्षा बुक करणे होणार महाग! १ जानेवारीपासून ५ टक्के जीएसटी

GST on Auto-rickshaw service | अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry)महसूल विभागाने १८ नोव्हेंबरला एका नोटिफिकेशनद्वारे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सेवा देणाऱ्या ऑटोरिक्षांना दिली जाणारी जीएसटी करातील सूट मागे घेतली आहे. या नोटिफिकेशननुसार ऑटो रिक्षा चालकांकडून दिली जाणाऱ्या ऑफलाइन किंवा नेहमीच्या सेवांवर जीएसटी करातील (GST)सूट सुरूच राहणार आहे. मात्र ई-कॉमर्सद्वारे दिल्या जाणाऱ्या ऑटोरिक्षा सेवेवर १ जानेवारीपासून ५ टक्के जीएसटी कर द्यावा लागणार आहे.

GST on Auto-rickshaw service
ऑटोरिक्षा सेवेवर जीएसटी कर 
थोडं पण कामाचं
  • ई-कॉमर्सद्वारे पुरवली जाणारी ऑटोरिक्षा सेवा होणार महाग
  • १ जानेवारी २०२२ पासून जीएसटी करात वाढ
  • जानेवारीपासून ई-कॉमर्स ऑटोरिक्षावर ५ टक्के जीएसटी कर

GST on Auto-rickshaw service | नवी दिल्ली : ई-कॉमर्सद्वारे (E-commerce) दिली जाणारी ऑटो-रिक्षा सेवा (Auto-rickshaw service)आता महाग होणार आहे. या ऑटो-रिक्षा सेवेवर १ जानेवारी २०२२ पासून ५ टक्के जीएसटी कर (GST on Auto-rickshaw service) आकारला जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry)महसूल विभागाने १८ नोव्हेंबरला एका नोटिफिकेशनद्वारे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सेवा देणाऱ्या ऑटोरिक्षांना दिली जाणारी जीएसटी करातील सूट मागे घेतली आहे. या नोटिफिकेशननुसार ऑटो रिक्षा चालकांकडून दिली जाणाऱ्या ऑफलाइन किंवा नेहमीच्या सेवांवर जीएसटी करातील (GST)सूट सुरूच राहणार आहे. मात्र ई-कॉमर्सद्वारे दिल्या जाणाऱ्या ऑटोरिक्षा सेवेवर १ जानेवारीपासून ५ टक्के जीएसटी कर द्यावा लागणार आहे. (From 1st January, 5% GST will be applicable on Auto-rickshaw service provided through e-commerce platform)

ऑटोरिक्षा प्रवास महागणार

जीएसटी करातील सूट रद्द झाल्याचा ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांवर प्रत्यक्ष परिणाम होणार आहे. अनेक ई-कॉमर्स कंपन्या अनेक ऑटोरिक्षा चालकांना आपल्या व्यासपीठाशी जोडून घेत ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देतात. ई-कॉमर्स ग्राहकांना जास्त स्वस्त, आरामदायी आणि बुकिंगच्या फ्लेक्सिबल सुविधा उपलब्ध करून देतात, त्यामुळे प्रवासी वाहतूक क्षेत्राच्या बाजारपेठेत या कंपन्यांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. मात्र जीएसटी करातील सूट रद्द झाल्याने आता ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे केली जाणारी बुकिंग महाग होणार आहे. यामुळे ऑनलाइन स्वरुपात ऑटोरिक्षा बुक करणे आणि ऑफलाइन ऑटोरिक्षा सेवा घेणे यातील दरात फरक पडणार आहे.

पादत्राणे आणि कपड्यांसाठीच्या जीएसटी दरात बदल

अलीकडेच सरकारने रेडीमेड कपडे आणि पादत्राणे या दोन वस्तूंवरील जीएसटी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर आधी ५ टक्के जीएसटी कर आकारला जात होता. मात्र आता यापुढे रेडीमेड कपडे आणि पादत्राणे यावर १२ टक्के जीएसटी कर आकारला जाणार आहे. नवे दर जानेवारी २०२२ पासून लागू केले जाणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अॅंड कस्टम्सने यासंदर्भातील नोटिफिकेशन जाहीर केले होते. नव्या घोषणेनुसार फॅब्रिक आणि धागे यावरील जीएसटी कर ५ टक्क्यांवरून वाढवून १२ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय तयार कपड्यांवर देखील १२ टक्के जीएसटी कर आकारला जाणार आहे. याआधी ज्या कपड्यांची किंमत १००० रुपयांपर्यत होती त्यांच्यावर ५ टक्के जीएसटी कर लागायचा. मात्र आता सर्वच कपड्यांवर १२ टक्के जीएसटी कर लागणार आहे.

अलीकडच्या काळात डिजिटल सेवांमध्ये मोठी वाढ झाल्याने आणि ई-कॉमर्स कंपन्या मोबाइल अॅपद्वारे सेवा पुरवत असल्यामुळे मोठ्या संख्येने ग्राहक ई-कॉमर्स सेवांद्वारे ऑटोरिक्षेचे बुकिंग करत आहेत. मात्र आता जीएसटी कर लागू झाल्याने ही सेवा महाग होणार आहे. याचा सर्वसामान्य प्रवाशांना दैनंदिन जीवनात फटका बसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी