HUL | १ जानेवारी पासून महाराष्ट्रात मिळणार नाहीत हिंदूस्थान युनिलिव्हरची उत्पादने, नागरिकांना बसणार फटका...

HUL products Supply | सर्वसामान्य नागरिकांना यामुळे अडचणीला तोंड द्यावे लागू शकते. महाराष्ट्रात तेल, साबण, शॅंम्पू यासारख्या वस्तूबाबत तुमच्या आवडीच्या ब्रॅंडच्या वस्तूंचा तुटवडा भासू शकतो. कारण १ जानेवारी २०२२ पासून देशातील आघाडीची एफएमसीजी (FMCG)कंपनी असलेल्या हिंदूस्थान युनिलिव्हर लि. म्हणजे एचयुएल (HUL)या कंपनीच्या मालाचा पुरवठा थांबवण्याची शक्यता आहे. कारण एचयुएलचे सप्लायर्स बाजारातील मालाचा पुरवठा बंद करण्याच्या विचारात आहेत

HUL Products
एचयुएलची उत्पादने 
थोडं पण कामाचं
 • १ जानेवारीपासून महाराष्ट्रात एचयुएलच्या मालाचा पुरवठा बंद
 • तुमच्या आवडीच्या दैनंदिन वापरातील उत्पादनांचा होणार अभाव
 • एचयुएल तेलापासून साबणापर्यत असंख्य लोकप्रिय वस्तूंचे करते उत्पादन

HUL products | मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra)मिळणारी दैनंदिन वापरातील वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे अडचणीला तोंड द्यावे लागू शकते. महाराष्ट्रात तेल, साबण, शॅंम्पू यासारख्या वस्तूबाबत तुमच्या आवडीच्या ब्रॅंडच्या वस्तूंचा तुटवडा भासू शकतो. कारण १ जानेवारी २०२२ पासून देशातील आघाडीची एफएमसीजी (FMCG)कंपनी असलेल्या हिंदूस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever Ltd) लि. म्हणजे एचयुएल (HUL)या कंपनीच्या मालाचा पुरवठा थांबवण्याची शक्यता आहे. कारण एचयुएलचे सप्लायर्स बाजारातील मालाचा पुरवठा बंद करण्याच्या विचारात आहेत. (From 1st January supply of HUL products may get stopped)

एचयुएलच्या सामानाची विक्री बंद करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सप्लायर्सचे म्हणणे आहे की कंपनी पारंपारिक सप्लायर्स आणि संघटीत बी२बी (बिझनेस टू बिझनेस) सप्लायर्स या दोघांना मिळणाऱ्या किंमतीमध्ये असणाऱ्या फरकाबद्दल त्यांच्याशी चर्चा करू इच्छित नाही. यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागते आहे.

काय करते आहे कंपनी

अर्थात एचयुएलचे म्हणणे आहे की त्यांनी वितरकांसंदर्भात त्यांची खास व्यवस्था नाही. वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड, ई-कॉमर्स आणि बीटूबी यांना दिली जाणारी किंमत ही व्यवस्थापन, नियमन आणि खर्च यासारख्या घटकांनुसार वेगवेगळी असू शकते. एचयुएलच्या प्रवक्त्याने म्हटले की आम्ही आपल्या उत्पादनांना सर्व चॅनेलद्वारे म्हणजे जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड, ईकॉम, कॅश अॅंड कॅरी, बीटूबी इत्यादीमध्ये विकतो आणि वितरित करतो. जेणेकरून वितरक आणि ग्राहक यांना आमची उत्पादने विकत घेणे सुलभ व्हावे.

रोजच्या वापरातील वस्तू बनवते एचयुएल

हिंदूस्थान युनिलिव्हर ही युनिलिव्हर या ब्रिटिश कंपनीची सहाय्यक कंपनी आहे. हिंदूस्थान युनिलिव्हरचे मुख्यालय मुंबईत आहे. हिंदूस्थान युनिलिव्हर अनेक प्रकारची उत्पादने बनवतो आणि ती बाजारात लोकप्रियदेखील आहेत. यात पॅकेज्ड फूड, तेल, साबण, ड्रिंक्स, कॉस्मेटिक्स, शॅम्पू यासारख्या उत्पादनांचा समावेस आहे. 

हिंदूस्थान युनिलिव्हर कोणकोणती उत्पादने आणि ब्रॅंड्सचे उत्पादन करते ते पाहूया-

 1. व्हिल (डिटर्जंट पावडर)
 2. एक्स (बॉडी डियो)
 3. बूस्ट(बेवरेज)
 4. ब्रीज (साबण)
 5. ब्रूक बॉन्ड (चहा)
 6. ब्रू (कॉफी)
 7. हॉर्लिक्स (बेवरेज)
 8. रेक्सोना(डियो)
 9. कार्नेटो (आइसक्रीम)
 10. किसान (जॅम आणि सॉस)
 11. नॉर (सूप)
 12. मॅग्नम(आइसक्रीम)
 13. लिप्टन (चहा)
 14. क्लोज अप (टूथपेस्ट)
 15. डव्ह (साबण)
 16. क्लियर (शॅम्पू)
 17. ग्लो अॅंड लव्हली(क्रीम)
 18. पियर्स (साबण)
 19. पेप्सोडेंट (टूथपेस्ट)
 20. पॉंड्स (क्रीम)
 21. रिन (डिटर्जंट)
 22. सनसिल्क(शॅम्पू)
 23. सर्फ एक्सेल (डिटर्जंट)
 24. व्हॅसलीन
 25. व्हिम
 26. लाइफबॉय (साबण)

बाजारात एचयुएलच्या उत्पादनांचा दबदबा

यासारखी असंख्य लोकप्रिय आणि दैनंदिन जीवनातील वापरातील उत्पादने आणि ब्रॅंड यांचे उत्पादन एचयुएल करते. त्यामुळे १ जानेवारीपासून जर एचयुएलच्या उत्पादनांच्या सप्लायर्सनी खरोखरच पुरवठा रोखला तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते कारण त्यांची आवडती उत्पादने आणि ब्रॅंड्स यांचा बाजारात तुटवडा भासू शकतो. वरील उत्पादनांबरोबरच इतरही अनेक उत्पादने एचयुएल बनवते. त्यामुळे ग्राहकांना किती अडचणीला तोंड द्यावे लागेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी