Tokenisation Update : 1 ऑक्टोबरपासून बदलणार कार्ड पेमेंटचे जग...काय आहे टोकनायझेशन आणि कशी होणार त्याची अंमलबजावणी

Tokenisation System : डिजिटल पेमेंट हा आता आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे. यामुळे पेमेंट करणे सोपे झाले असले तरी फसवणुकीच्या घटनादेखील वाढल्या आहेत. त्यामुळेच आरबीआयने एक नवीन व्यवस्था यासंदर्भात लागू करण्याचे ठरवले आहे. रिझर्व्ह बँक 1 ऑक्टोबरपासून टोकनायझेशन प्रणाली लागू करते आहे. ही प्रणाली नेमकी काय आहे आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार ते पाहूया.

Tokenisation
टोकनायझेशन व्यवस्था 
थोडं पण कामाचं
  • कोरोनाच्या संकट काळापासून डिजिटल पेमेंटमध्ये तर खूपच विस्तार झाला
  • डिजिटल पेमेंटसंदर्भातील फसवणुकीच्या घटना वाढल्या
  • फसवणुकीला आळा घालण्यासाठी आरबीआय लागू करणार टोकनायझेशन प्रणाली

Digital Payment New Rule : नवी दिल्ली : मागील काही वर्षात डिजिटल व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेक आर्थिक व्यवहार आता डिजिटल स्वरुपात केले जातात. डिजिटल पेमेंट (Digital Payment) हा आता आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे. खास करून कोरोनाच्या संकट काळापासून डिजिटल पेमेंटमध्ये तर खूपच वेग आला आहे आणि विस्तार झाला आहे. मात्र त्याचबरोबर डिजिटल पेमेंटमध्ये  फसवणुकीच्या (Fraud) घटनांमध्येदेखील मोठी वाढ झाली आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने अनेकदा चिंतादेखील व्यक्त केली आहे. डिजिटल पेमेंटमधील फसवणुकीला आळा घालण्यासाठी आरबीआय वेळोवेळी पावले उचलत असते.  यासाठी आता रिझर्व्ह बँक (RBI) 1 ऑक्टोबरपासून टोकनायझेशन प्रणाली (Tokenisation System) लागू करते आहे. याचा डिजिटल पेमेंटवर मोठा परिणाम होणार आहे.  जाणून घेऊया काय आहे ही टोकनायझेशन प्रणाली नेमकी काय आहे. (From 1st October Tokenisation system to be implemented for digital payments)

अधिक वाचा :  अभिनेता इमरान हाश्मीवर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक

टोकनायझेशन म्हणजे काय? (What is Tokenisation)

आपण जेव्हा एखादी वस्तू ऑनलाइन ऑर्डर करतो तेव्हा ती वेबसाइट तुम्हाला कार्ड तपशील विचारते. एकदा माहिती शेअर केल्यानंतर, संपूर्ण व्यवहार फक्त OTP द्वारे केला जातो. मात्र टोकनायझेशनचा नियम लागू झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे बदलेल. या प्रक्रियेत तुमचे कार्ड तपशील कोडमध्ये रूपांतरित केले जातील. या प्रक्रियेला 'टोकनिंग' म्हणतात. म्हणजेच तुमच्या कार्डचा कोणताही नंबर त्या ई-कॉमर्स कंपनीसोबत शेअर केला जाणार नाही. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी हा नियम लागू करण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे.

अधिक वाचा : KBC 14मध्ये 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या कवितानं वर्षभरापूर्वीच दिलं होतं ऑडिशन

टोकनायझेशन व्यवस्था काम कशी करते?

सर्वप्रथम, कोणत्याही ई-कॉमर्स किंवा जिथे तुम्ही पेमेंट करत आहात अशा कंपनीच्या वेबसाइटवर चेकआउट करताना डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती द्यावी लागेल. यानंतर, ग्राहकाला 'सेक्योर युवर कार्ड' पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर ग्राहकाला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ई-मेलवर OTP द्वारे टोकनायझेशन प्रणाली अधिकृत करावी लागेल. एकदा तुम्हाला टोकन मिळाले की तुम्ही कार्डवरील माहितीला टोकनद्वारे बदलू शकता. म्हणजेच आता कंपनीकडे तुमच्या कार्डची माहिती म्हणून एकच कोड असेल. यामुळे तुमच्या कार्डच्या माहितीचा वापर होणार नाही. परिणामी डिजिटल पेमेंट करताना तुमच्या कार्डच्या माहितीची चोरी करून त्याचा दुरुपयोग करून फसवणूक करण्यावर आळा बसेल. तुमच्या माहितीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार, 19.5 कोटी लोक आधीच टोकन प्रणाली वापरत आहेत.

अधिक वाचा : Diabetes Food : मधुमेहात फळे खाण्याआधी जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी, काय खावे आणि काय नाही

टोकनायझेशनची 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

टोकनायझेशनची ही प्रणाली आधी 1 जुलैपासून लागू होणार होती. मात्र काही कारणांमुळे आरबीआयने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला. पुन्हा एकदा तारीख वाढवण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आता 1 ऑक्टोबरपासून टोकनायझेशनसाठी तुम्ही तयार असले पाहिजे.

याआधीदेखील आरबीआयने डिजिटल पेमेंट व्यवस्था सक्षम होण्यासाठी वेळोवेळी पावले उचलली आहेत. डिजिटल जमान्यात व्यवस्था कायमच अपडेट कराव्या लागतात. त्यात सुधारणादेखील कराव्या लागतात. मात्र यावेळी प्रक्रिया अधिक सुरक्षित होत जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी