Petrol Diesel Prices | पेट्रोल, डिझेल दरवाढ उच्चांकीवर, आज पुन्हा भाववाढ

Petrol Diesel Prices | पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रति लिटर ३५ पैशांची वाढ. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात झालेली वाढ ही आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे असल्याचे सांगण्यात येते आहे.

Petrol diesel prices
पेट्रोल आणि डिझेलचे दर 
थोडं पण कामाचं
  • शनिवारी (३० ऑक्टोबर) सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil)किंमतीत सातत्याने भाववाढ
  • मुंबईत पेट्रोलचा ११४.८१ रुपये प्रति लिटरला आणि डिझेलचा दर १०५.८६ रुपये प्रति लिटरवर पोचला

Fuel Price Hike | नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ (Petrol Diesel Price Hike)सुरूच आहे. शनिवारी (३० ऑक्टोबर) सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ (Fuel Price Hike) झाली आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात झालेली वाढ ही आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे असल्याचे सांगण्यात येते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil)किंमतीत सातत्याने भाववाढ होताना दिसून येते आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price) प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ झाली आहे. (Fuel Price Hike: Petrol, diesel prices rise for the fourth straight day on Saturday)

पेट्रोल आणि डिझेल उच्चांकीवर

दिल्लीमध्ये पेट्रोल आता १०८.९९ रुपये प्रति लिटरवर पोचले आहे. तर डिझेलचे दर ९७.७२ रुपये प्रति लिटरवर पोचले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचा ११४.८१ रुपये प्रति लिटरला मिळते आहे. मुंबईत डिझेलचा दर १०५.८६ रुपये प्रति लिटरवर पोचला आहे. चेन्नईमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नईत पेट्रोल १०५.७४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १०१.९२ रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०९.४६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १००.८४ रुपये प्रति लिटरला मिळते आहे. देशातील आणखी एक महत्त्वाचे शहर असलेल्या बंगळूरूमध्ये पेट्रोल ११२.७९ रुपये प्रति लिटरवर आणि डिझेल १०६.६० रुपये लिटरवर पोचले आहे.

देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरवाढ

देशातील बहुतांश भागात पेट्रोल आणि डिझेलचे भाव १०० रुपये प्रति लिटरच्या पलीकडे पोचले आहेत. यात मध्यप्रदेश, राजस्थान, ओडाशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, बिहार, केरळ, कर्नाटक आणि लेह इत्यादी ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कडाडले आहेत. देशातील सर्वच राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव वेगवेगळे असतात कारण प्रत्येक राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारप्रमाणेच कर आकारत असते. करांचे हे दर प्रत्येक राज्याचे वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात इंधनाच्या दरात थोडा फरक दिसून येतो. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले

पेट्रोलियम कंपन्या आणि वितरकांनी ६ ऑक्टोबरपासून इंधनाच्या दरात झालेल्या वाढीचा मोठा हिस्सा हा ग्राहकांकडून वसूल करण्यास सुरूवात केली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढ होत असल्यामुळे पडणारा अतिरिक्त भार पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांकडून वसूल करत आहेत. मागील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ५० डॉलर प्रति बॅरलवरून आधी ७५ डॉलर प्रति बॅरलवर आणि नंतर ८५ डॉलर प्रति बॅरलवर पोचले आहेत. भारत कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावावर परिणाम होतो. देशातदेखील इंधनाचे दर वाढतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी