Petrol Diesel Price | पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, पाहा कोणत्या शहरात किती आहे दर

Petrol Diesel Price Today: मुंबई, कोलकाता आणि चैन्नईसह देशातील विविध शहरांमध्ये रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातत कोणताही बदल झाला नाही. ब्रेंड क्रूडची किंमत ८० डॉलर प्रति बॅरलवरून वाढून ८४ डॉलर प्रति बॅरलवर पोचली आहे. जाणकारांच्या मते क्रूडच्या किंमतीत आणखी मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच आहे.

Petrol Diesel Price
पेट्रोल आणि डिझेलचे दर 
थोडं पण कामाचं
  • इंडियल ऑइल कॉर्पोरेशन (IOC), एचपीसीएल (HPCL)आणि बीपीसीएलने (BPCL) इंधनाच्या दरात बदल नाही
  • मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रति लिटरने तर डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटरने मिळते आहे
  • ब्रेंड क्रूडची किंमत ८० डॉलर प्रति बॅरलवरून वाढून ८४ डॉलर प्रति बॅरलवर पोचली आहे

Petrol Diesel Price Today: नवी दिल्ली : सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी (etroleum Companies) पेट्रोल (Petrol price)आणि डिझेलच्या दरांची (Diesel price) माहिती दिली आहे. इंडियल ऑइल कॉर्पोरेशन (IOC), एचपीसीएल (HPCL)आणि बीपीसीएलने (BPCL) रविवारी इंधनाच्या दरात कोणताही बदल केला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चैन्नईसह देशातील विविध शहरांमध्ये रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातत कोणताही बदल झाला नाही. सध्या दिल्लीमध्ये पेट्रोलची भाव १०३.९७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे. (Petrol Diesel Price Today: Petroleum Companies declared the rates for petrol & Diesel, check the price in your city)

विविध राज्यांमध्ये पेट्रोलचा भाव

शुल्क कपात केल्यानंतर सर्वात महागडे पेट्रोल राजस्थानातील जयपूर येथे १११.१० रुपये प्रति लिटरने मिळते आहे. त्यानंतर मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रति लिटरने मिळते आहे. तर आंध्रप्रदेशात १०९.०५ रुपये प्रति लिटरने मिळते आहे. भाजप शासित राज्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या खाली आले आहेत. अर्थात अद्यापही मध्य प्रदेशात पेट्रोल १०७.२३ रुपये प्रति लिटर आणि बिहारमध्ये १०५.९० रुपये प्रति लिटरने पेट्रोल मिळते आहे. याच प्रकारे सर्वात महाग डिझेल राजस्थानातील जयपूर येथे ९५.७१ रुपये प्रति लिटरने विकले जाते आहे. तर आंध्रप्रदेशात डिझेलचा भाव ९५.१८ रुपये प्रति लिटर आणि मुंबईत ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे. तर मिझोरममध्ये मात्र डिझेल ७९.५५ रुपये प्रति लिटरने मिळते आहे. देशातील हा सर्वात कमी भाव आहे.

पाहा तुमच्या शहरात काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव -

शहर पेट्रोल (रुपये/लीटर)  डिझेल (रुपये/लीटर)
नवी दिल्‍ली 103.97 86.67
मुंबई 109.98 94.14
कोलकाता 104.67 89.79
चेन्‍नई 101.40 91.42
भोपाल 107.23 90.87
हैदराबाद 108.20 94.62
बंगळूरू 100.58 85.01
लखनौ 95.28 86.80

 

असा तपासा इंधनाचा भाव

इंडियल ऑइलचे ग्राहक आपल्या मोबाइलवरून RSP सोबत शहराचा कोड टाकून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात. शहराचा कोड तुम्हाला इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल. मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचा ताजा भाव पाठवला जाईल. याचप्रकारे बीपीसीएलचे ग्राहक RSP टाइप करत ९२२३११२२२२ या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतात. एचपीसीएलचे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ वर एसएमएस पाठवू शकतात.

कच्च्या तेलाच्या किंमतीतील तेजी

जगभरातील कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांचे संघटन म्हणजे ओपेक. ओपेक आणि रशियाने दर महिन्याला ४ लाख बॅरल प्रति दिन इतके कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणकारांच्या मते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपले मत व्यक्त केलेले असूनदेखील ओपेक आपल्या पद्धतीने काम करते आहे. यामुळे सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीतील तेजीचे वातावरण आहे. ब्रेंड क्रूडची किंमत ८० डॉलर प्रति बॅरलवरून वाढून ८४ डॉलर प्रति बॅरलवर पोचली आहे. जाणकारांच्या मते क्रूडच्या किंमतीत आणखी मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच आहे. कारण भारत आणि चीनसारख्या देशांकडून कच्च्या तेलाची मागणी वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे आगामी काळात ब्रेंट क्रूडचे भाव ८० ते ९० डॉलर प्रति बॅरलच्या दरम्यान राहू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी