Petrol Price | पेट्रोलचा भाव जाऊ शकतो १५० रुपयांपर्यत, डिझेलदेखील महागण्याची शक्यता

Fuel Prices : जर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये जबरदस्त वाढ झाली तर पेट्रोलचा भाव १५० रुपये प्रति लिटरच्या पातळीवर पोचू शकतो. तर डिझेलचा भावदेखील १४० रुपये प्रति लिटरवर पोचू शकतो.

Petrol-Diesel Price
पेट्रोल आणि डिझेलचे दर 
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल आणि डिझेल या इंधनांच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता
  • या महिन्यात आतापर्यत २८ दिवसांमध्ये २१ दिवस इंधनाच्या दरात वाढ
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आगामी काळात म्हणजे पुढील वर्षांपर्यत चांगलेच महाग होऊ शकते

Petrol Price Hike | नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेल या इंधनांच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच पेट्रोल (Petrol Price Hike) आणि डिझेलच्या भाववाढीमुळे (Diesel Price Hike)सर्वसामान्य माणूस हैराण झालेला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचा भाव (Petrol Price)प्रति लिटरसाठी १०० रुपयांच्या वर पोचला आहे. तर अनेक शहरांमध्ये डिझेलचा भावदेखील (Diesel Price) १०० रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त झाला आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्या भाववाढीला लगाम न लागता आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. (Petrol Price: Petrol & diesel prices may shot in upcoming time, Petrol may hike upto Rs 150 per liter)

इंधन दरवाढीची भीती

गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आगामी काळात म्हणजे पुढील वर्षांपर्यत चांगलेच महाग होऊ शकते. म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमती ११० डॉलर प्रति डॉलरपर्यत जाऊ शकतात. सध्या कच्च्या तेलाची किंमत ८५ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीपेक्षा ३० टक्के जास्त आहे. अंदाजानुसार कच्च्या तेलाची किंमत १४७ डॉलर प्रति बॅरलच्या ऑल टाइम उच्चांकी पातळीवरदेखील पोचू शकते. २००८ मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती या पातळीवर पोचल्या होत्या. २००८ मध्ये आर्थिक संकटामुळे जगभरात मंदीचे वातावरण होते. गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार जर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये जबरदस्त वाढ झाली तर पेट्रोलचा भाव १५० रुपये प्रति लिटरच्या पातळीवर पोचू शकतो. तर डिझेलचा भावदेखील १४० रुपये प्रति लिटरवर पोचू शकतो. 

नजीकच्या भविष्यात इंधनाच्या दरात दिलासा नाही

पेट्रोल आणि डिझेलच्या भावात नजीकच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात ३५-३५ पैशांची प्रति लिटरमागे वाढ झाली. सध्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव १०८.२९ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव ९७.०२ रुपये प्रति लिटरच्या विक्रमी पातळीवर आहे. या महिन्यात आतापर्यत २८ दिवसांमध्ये २१ दिवस इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ६.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ७.२५ रुपये प्रति लिटरने महाग झाले आहे. 

सातत्याने इंधन भाववाढ

देशात पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाच्या भावात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होते आहे. पेट्रोल ६.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ७.२५ रुपये प्रति लिटरने महाग झाले आहे. जुलै महिन्यात पहिल्यांदा पेट्रोलचा भाव १०० रुपये प्रति लिटरच्या पातळीवर पोचला होता.

भारत तेलासाठी प्रामुख्याने आयातीवर अवलंबून आहे. यामुळे ज्या देशांमधून तेल खरेदी केले जाते त्या देशांतील तेल कंपन्यांशी चर्चा करुन दर नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. जगभरात मागणीच्या तुलनेत तेलाचे उत्पादन आणि पुरवठा यांच्यात घट झाली आहे. यामुळे ज्या देशांमध्ये जास्त मागणी आहे त्या सर्व देशांमध्ये तेलाच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी