पेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिरच!

Fuel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये शनिवारी कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमधील पेट्रोलच्या किंमती स्थिरच आहेत.

Fuel Price
पेट्रोल-डिझेलचे दर 

थोडं पण कामाचं

  • देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर
  • जुलै महिन्यात झाली मोठी दरवाढ
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत घसरण होऊनच देशातील पेट्रोल (Petrol rate)आणि डिझेलच्या (Diesel rate) किंमती मात्र जैस थे आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये शनिवारी कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमधील पेट्रोलच्या किंमती स्थिरच आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत, 97.76 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर मुंबईत पेट्रोल १०७.८३ रुपये प्रति लिटर या दराने मिळत होते. कोलकात्यात पेट्रोलची किंमत १०२.०८ रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.४९ रुपये प्रति लिटर इतका आहे. डिझेलचे दरदेखील स्थिरच आहेत. (Today's Petrol Price Today's Diesel Price 25 July 2021 Sunday)

देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

देशात राजस्थानमधील गंगानगर आणि मध्यप्रदेशमधील अनुपपूर या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा दर सर्वाधिक आहे. गंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोल दर ११३ रुपये २१ पैसे आणि एक लिटर डिझेलचा दर १०३ रुपये १५ पैशांवर पोचले होते. तर अनुपपूरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ११२ रुपये ७८ पैसे आणि एक लिटर डिझेलचा दर १०१ रुपये १५ पैशांवर पोचला होता.

शहर  पेट्रोल (रुपये/लिटर)  डिझेल (रुपये/लिटर)
नवी दिल्‍ली  102.08 89.87
मुंबई 107.83 97.45
कोलकाता 102.08 93.02
चेन्‍नई 102.49 94.39
नोएडा  99.14 90.46
बंगळूरु 105.25 95.26
हैदराबाद 105.83 97.96
पाटणा 104.42 95.67
जयपूर 108.71 99.02
लखनऊ 98.91 90.26
गुरुग्राम 99.30 90.32
चंडीगढ़ 97.93 89.50

जुलै महिन्यात मोठी दरवाढ


जुलै महिन्यात नवव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली. डिझेलच्या किंमती जुलै महिन्यात पाचवेळा वाढल्या. एकदा डिझेलच्या किंमतीत घट झाली. जून आणि मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी १६ वेळा वाढ झाली. दरवाढीची सुरुवात ४ मे २०२१ पासून झाली. याआधी पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होती त्या काळात तब्बल १८ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर असे माहित करून घ्या

आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी RSP असे टाइप करुन एक स्पेस द्या. पुढे शहराचा कोड नंबर टाइप करा आणि हा एसएमएस आपण ज्या वितरक कंपनीच्या पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ इच्छिता त्यांना पाठवा. लक्षात ठेवा प्रत्येक शहराचा कोड स्वतंत्र आहे. या कोडची माहिती आपल्याला इंडियन ऑईलच्या वेबसाइटवर मिळू शकेल. इंडियन ऑईलच्या (आयओएल) पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी 9224992249 वर एसएमएस पाठवा. भारत पेट्रोलियमच्या (बीपीसीएल) पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी 9223112222 वर एसएमएस पाठवा. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या (एचपीसीएल) पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी 9222201122 वर एसएमएस पाठवा.

इंधनाचे वाढते दर

पेट्रोलच्या किंमतीमध्ये 4 मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली. एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. इंधनाच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. इतरही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरवर पोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये होणाऱ्या बदलांचाही परिणाम देशातील इंधनाच्या दरावर होतो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी