राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा, अकरावीच्या प्रवेशाची चिंता मिटणार 

काम-धंदा
Updated Jun 18, 2019 | 14:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण (इंटरनल्स) रद्द केल्याने या बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर होणार अन्याय दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील जागा वाढविण्य

fyjc online admission seats increase
अकरावी प्रवेशाचा प्रश्न सुटणार, जागा वाढवण्याच्या निर्णयाची शिक्षण मंत्र्यांकडून घोषणा  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण (इंटरनल्स) रद्द केल्याने या बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर होणार अन्याय दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्याचे नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भातील एक निवेदन विधानसभेच्या सभागृहात करून राज्यातील एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. या संदर्भात शिवसेनेचे नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार, युतीच्या घटक पक्षाच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, पुणे, नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीची वाढीव टक्केवारी यावेळी जाहीर केली आहे. शेलार यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अकरावीत प्रवेश घेणाऱ्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निवेदन केले. या निवेदनात त्यांनी सांगितले की, मुंबई, पुणे आणि नागपूरातील महाविद्यालयात अॅडमिशन घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो, त्यामुळे या शहरातील महाविद्यालयातील प्राचार्यांशी संपर्क साधून अॅडमिशनच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अंतर्गत गुण (इंटरनल्स) रद्द केल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अकरावीच्या ऑललाइन प्रवेश प्रक्रियेत काही टक्के जागा वाढविण्यात येणार आहेत. 

मुंबई शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेसाठी ५ टक्के, तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढविण्यात येणार आहेत. तर पुणे आणि नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयातील तीनही शाखांसाठी १० टक्के जागा वाढविण्यात येणार आहेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी प्रवेशापासून राज्यातील एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही असे यावेळी शेलार यांनी स्पष्ट केले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा, अकरावीच्या प्रवेशाची चिंता मिटणार  Description: एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण (इंटरनल्स) रद्द केल्याने या बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर होणार अन्याय दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील जागा वाढविण्य
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola