लवकरच सर्व गरीब रथ गाड्या बंद होणार, नाही करू शकणार स्वस्तात AC गाड्यांनी प्रवास 

गरीब आणि लोअर मिडल क्लास वर्गासाठी स्वस्तात एसी रेल्वे प्रवास घडविणारी गरीब रथ एक्सप्रेस लवकरच बंद होण्याची चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे रेल्वे मंत्रालय लवकरच देशभरात सुरू असलेल्या गरीब रथ एक्स्प्रेस बंद करणार आ

indian railway
गरीब रथ एक्स्प्रेस होणार बंद, सुरू होणार मेल  

थोडं पण कामाचं

  • गरीब रथच्या जागेवर चालणार मेल किंवा एक्स्प्रेस ट्रेन्स 
  • काठगोदाम-कानपूर, काठगोदाम-जम्मू गरीब रथ बंद
  • सध्या भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे २६ जोड्या या गरीब रथ गाड्यांच्या सुरू आहेत.

नवी दिल्ली :  गरीब आणि लोअर मिडल क्लास वर्गासाठी स्वस्तात एसी रेल्वे प्रवास घडविणारी गरीब रथ एक्सप्रेस लवकरच बंद होण्याची चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे रेल्वे मंत्रालय लवकरच देशभरात सुरू असलेल्या गरीब रथ एक्स्प्रेस बंद करणार आहे.  रेल्वे मंत्रालयाकडून अत्यंत गुप्तपणे एसी रेल्वे प्रवासच्या कन्सेप्टवर सुरू असलेली गरीब रथ एक्स्प्रेस बंद करण्यासाठी वेगाने पाऊले टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गरीब रथ ट्रेनसाठी नवे कोच आणि डब्बे बनविणे बंद करण्याचे आदेश सरकारने यापूर्वीच दिले आहेत. 

गरीब रथच्या जागेवर चालणार मेल किंवा एक्स्प्रेस ट्रेन्स 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गरीब रथ ट्रेनच्या ऐवजी मेल किंवा एक्स्प्रेस ट्रेन चालविण्यात येणार आहे. याचा सरळ अर्थ होतो की आगामी काळात गरीब रथ गाड्यांच्या वेळापत्रकावर दुसरी एक्स्प्रेस ट्रेन चालणार आहे. मंत्रालयकडून गरीब रथ ट्रेन बंद करण्यावर आणि मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालविण्यावर पाऊले उचलण्यास सुरूवात झाली आहे. गरीब रथ एक्स्प्रेस ही तत्कालिन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी २००६ मध्ये सुरू केल्या होत्या. 

काठगोदाम-कानपूर गरीब रथ बंद

काठगोदाम-जम्मू आणि काठगोदाम-कानपूर गरीब रथ ट्रेनला बंद करून त्याचे रुपांतर मेलमध्ये करण्यात आले आहे. या दोन्ही मार्गांवरील गरीब रथ एक्स्प्रेस बंद करण्यात आली आहे. गरीब रथ एक्स्प्रेस बंद करून मेल सुरू केल्याने रेल्वेला भाड्यामध्ये फायदा झाला आहे. उदारणार्थ तुम्ही दिल्ली ते वांद्रे असा प्रवास केला तर तुम्हांला सुमारे १०२० रुपये द्यावे लागतात. पण तोच प्रवास इतर एक्स्प्रेस आणि आणि मेलने केला तर तुम्हांला १५०० ते १६०० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे रेल्वेच्या महसुलात आणखी वाढ होणार आहे. 

जुन्या डब्यांची दुरुस्ती ही रेल्वेसाठी डोकेदुखी 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गरीब रथ कोच बनविणे यापूर्वीच बंद केले आहेत. त्यामुळे या ट्रेनला हळूहळू ट्रेन नेटवर्कमधून बाहेर करावेच लागेल. दुसरे जे पण गरीब रथ चालत आहेत ते १० ते १४ वर्ष जुने आहेत. अशात जुन्या डब्यांची दुरुस्ती करणे रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यांच्यासमोर याची दुरुस्ती खूप मोठे आव्हान आहे. सध्या भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे २६ जोड्या या गरीब रथ गाड्यांच्या सुरू आहेत. एकूण ५२ गरीब रथ एकावेळी धावत आहेत. 


सूत्रांनी सांगितले की गरीब रथला बंद करून तीन एसी ट्रेन चालविण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेला मोठी कमाई होणार आहे. गरीब रथ ट्रेनच्या देखभालीसाठी होणाऱ्या खर्चातून वाचण्यात येील. गरीब रथ एक्स्प्रेस या रेल्वेकडून चालविण्यात आलेल्या कमी भाड्यात चालविण्यात आलेल्या वातानुकूलित रेल्वे गाड्या आहेत. यांचा उद्देश कमी खर्चा प्रवाशांना वातानुकूलित प्रवासाला लाभ द्यावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
लवकरच सर्व गरीब रथ गाड्या बंद होणार, नाही करू शकणार स्वस्तात AC गाड्यांनी प्रवास  Description: गरीब आणि लोअर मिडल क्लास वर्गासाठी स्वस्तात एसी रेल्वे प्रवास घडविणारी गरीब रथ एक्सप्रेस लवकरच बंद होण्याची चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे रेल्वे मंत्रालय लवकरच देशभरात सुरू असलेल्या गरीब रथ एक्स्प्रेस बंद करणार आ
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...