Gas Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा तडका, CNG आणि LPG च्या किमतीमध्ये वाढ

CNG-LPG Rate:नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्यानंतर सीएनजी 8 ते 12 रुपये किलोने महागण्याची शक्यता आहे, तर एलपीजी सिलेंडरचे दर प्रति युनिट 6 रुपयांनी वाढू शकतात.

Gas Price Hike: CNG and LPG prices rise ahead of festive season due to inflationary pressure
Gas Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा तडका, CNG आणि LPG च्या किमतीमध्ये वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सीएनजी 8 ते 12 रुपये प्रति किलोने महागण्याची शक्यता
  • एलपीजीच्या दरात प्रति युनिट 6 रुपयांनी वाढ होणार
  • महानगर गॅस लिमिटेड या मुंबईतील किरकोळ विक्रेत्याला 9 रुपयांनी दरवाढ करावी लागेल. 

मुंबई : नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्यानंतर सीएनजी 8 ते 12 रुपये प्रति किलोने महागण्याची शक्यता आहे, तर एलपीजीच्या दरात प्रति युनिट 6 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. (Gas Price Hike: CNG and LPG prices rise ahead of festive season due to inflationary pressure)

अधिक वाचा : BOB Recruitment: बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, एक-दोन नव्हे तब्बल 346 जागा; त्वरीत करा अर्ज नका सोडू Chance

सरकारने गेल्या आठवड्यात जुन्या गॅस फील्डमधून तयार होणाऱ्या गॅससाठी दिलेला दर सध्याच्या $6.1 प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट (प्रति युनिट) वरून $8.57 प्रति युनिट इतका वाढवला आहे. त्याच वेळी, कठीण भागातून काढलेल्या गॅसची किंमत $9.92 वरून $12.6 प्रति युनिट करण्यात आली आहे. या दराच्या आधारे देशात उत्पादित होणाऱ्या गॅसपैकी दोन तृतीयांश गॅस विकला जातो.

अधिक वाचा : Fake Medicine: आता बनावट औषधांना बसणार लगाम! एका क्युआर कोडने ग्राहकांना ओळखता येणार असली-नकली

खते तयार करण्यासाठी तसेच वीज निर्मितीसाठी नैसर्गिक वायू हा प्रमुख कच्चा माल आहे. त्याचं रूपांतर CNG मध्येही केलं जातं आणि स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठीही पाइप्ड (PNG) वापरलं जातं. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने सांगितले की, जुन्या गॅस फील्डमधून तयार होणाऱ्या गॅसच्या किमती केवळ एका वर्षात जवळपास पाच पटीने वाढल्या आहेत. त्याची किंमत सप्टेंबर 2021 मध्ये $1.79 प्रति mmBtu वरून सप्टेंबर 2021 मध्ये $8.57 वर पोहोचली.

अधिक वाचा : House Buying Tips: सणासुदीच्या काळात घर घेण्याचा प्लॅन आहे...मग या गोष्टी तपासा, एजंट नाही सांगणार

एमएमबीटीयू गॅसच्या दरात प्रत्येक डॉलरच्या वाढीसाठी, सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) संस्थांना सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 4.7 ते 4.9 रुपयांनी वाढ करावी लागेल. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, कच्च्या मालाच्या उच्च खर्चाचा परिणाम पूर्णपणे भरून काढण्यासाठी सीएनजी आणि पीएनजीच्या किमती 6.2 रुपये प्रति मानक घनमीटर आणि प्रति किलो 9 ते 12.5 रुपये वाढवाव्या लागतील.

जेफरीज म्हणाले की, राष्ट्रीय राजधानीत सीएनजी आणि पीएनजीचा किरकोळ विक्री करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडला सीएनजीच्या किमतीत 8 रुपये प्रति किलोने वाढ करावी लागेल, तर महानगर गॅस लिमिटेड या मुंबईतील किरकोळ विक्रेत्याला 9 रुपयांनी दरवाढ करावी लागेल. कोटक म्हणाले की, अनेक कारणांसाठी घरगुती गॅसच्या किमतीच्या फॉर्म्युलावर पुनर्विचार करण्याची आणि 'फ्लोर/सीलिंग' किमती लागू करण्याची गंभीर गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी