Gautam Adani | अदानी समूह बनणार जगातील सर्वात मोठी अपारंपारिक ऊर्जा कंपनी, ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक

Adani group | अदानी ग्रीन एनर्जी लि. ही (Adani Green Energy Ltd) अदानी समूहाचीच एक कंपनी जगातील सर्वात मोठी सौरऊर्जा (Solar Energy company) कंपनी आहे. अदानी ग्रीन एनर्जीने २०३०पर्यत ४५ गिगावॅट्स अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी अपारंपारिक ऊर्जेपासून ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करणार असून हे एक चमत्कारिक इंधन असणार आहे. ग्रीन हायड्रोजन अधिक स्वस्तात बनवल्यामुळे देशाचे रुपांतर ग्रीन एनर्जीच्या निर्यातदारामध्ये होईल. ब्लूमबर्ग इंडिया इकॉनॉमिक फोरमशी बोलताना अ

Adani group investment in renewable energy
अदानी समूहाची अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • अदानी समूह अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात जबरदस्त मोठी गुंतवणूक करणार
  • अदानी समूह जगातील सर्वात मोठी अपारंपारिक ऊर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जी (Renewable Energy) कंपनी बनणार
  • पुढील दशकभरात करणार अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक

Adani group | मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी (Gautam Adani) यांचा अदानी समूह अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात जबरदस्त मोठी गुंतवणूक करणार आहे. अदानी समूह अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढील दशकभरात करणार आहे. जगातील सर्वात मोठी अपारंपारिक ऊर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जी (Renewable Energy) कंपनी बनण्यासाठी अदानी समूहाकडून (Adani group) ही गुंतवणूक केली जाणार आहे. पृथ्वीवरील सर्वात स्वस्त हायड्रोजन बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अदानी ग्रीन एनर्जी लि. ही (Adani Green Energy Ltd) अदानी समूहाचीच एक कंपनी जगातील सर्वात मोठी सौरऊर्जा (Solar Energy company) कंपनी आहे. अदानी ग्रीन एनर्जीने २०३०पर्यत ४५ गिगावॅट्स अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनी २०२२-२३ पर्यत प्रत्येक सौरऊर्जा प्रकल्पातून २ गिगावॅट ऊर्जा निर्मिती करण्यासाठी २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.  (Gautam Adani : Adani group to become world's largest renewable energy company)

देशातील सर्वात मोठी खासगी ऊर्जा कंपनी

अदानी ट्रान्समिशन लि. ही ऊर्जा वितरण आणि ऊर्जा प्रेषण क्षेत्रातील देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी सध्याच्या ३ टक्के ऊर्जा खरेदीला २०२३ पर्यत ३० टक्क्यांपर्यत वाढवणार आहे तर २०३०पर्यत ७० टक्क्यांपर्यत वाढ कंपनी करणार आहे. ब्लूमबर्ग इंडिया इकॉनॉमिक फोरमशी बोलताना अदानी समूहाचे संस्थापक चेअरमन गौतम अदानी यांनी सांगितले की अदानी समूह हा अपारंपारिक ऊर्जेला कार्बन इंधनापेक्षा अधिक स्वस्त आणि सुलभ करण्यावर काम करतो आहे.

इंधनाच्या बाबतीत स्वावलंबन

अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी अपारंपारिक ऊर्जेपासून ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करणार असून हे एक चमत्कारिक इंधन असणार आहे. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात भारताची वाढ ही जबरदस्त वेगाने होते आहे. ग्रीन हायड्रोजन अधिक स्वस्तात बनवल्यामुळे देशाचे रुपांतर ग्रीन एनर्जीच्या निर्यातदारामध्ये होईल. कच्च्या तेल, नैसर्गिक वायूसारख्या इंधनावर भारताला अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतींचा भारतावर परिणाम होणार नाही आणि इंधनाच्या बाबतीत देश स्वावलंबी होईल, असे मत गौतम अदानी यांनी व्यक्त केले. ग्लासगो येथे झालेल्या COP 26 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०७० पर्यत शून्य कार्बन उत्सर्जनापर्यत पोचण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले होते.

ट्रॅव्हल बिझनेसमध्ये अदानी

गौतम अदानी (Gautam Adani)यांचा अदानी समूह जोरदार घोडदौड करतो आहे. अदानी समूह (Adani Group)आता ट्रॅव्हल व्यवसायात शिरतो आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या क्लिअरट्रिप प्रा लि. (Cleartrip)मध्ये अदानी समूहाने हिस्सेदारी विकत घेण्याची घोषणा केली आहे. गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानी समूहाने अद्याप क्लिअरट्रिपमधील आपल्या नेमक्या गुंतवणुकीची माहिती दिलेली नाही. मात्र अदानी समूहाने यात मोठी रक्कम गुंतवली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. क्लिअरट्रिप या डिजिटल ट्रॅव्हल कंपनीत देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट समूहाचादेखील (Flipkart Group) हिस्सा आहे. कोरोना काळात (Covid-19 pandemic) विविध निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी