Gautam Adani : बिल गेट्सच्या 20 अब्ज डॉलरच्या देणगीनंतर गौतम अदानी बनले जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

Forbes world’s richest list : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) आता फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत (world’s richest list)चौथ्या स्थानावर पोचले आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Microsoft founder Bill Gates)यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या विना नफा तत्वावर चालणाऱ्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला 20 अब्ज डॉलरची संपत्ती दान करणार आहेत.

Gautam Adani world’s 4th richest
बिल गेट्सना मागे टाकत अदानी जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती 
थोडं पण कामाचं
  • गौतम अदानींची जगातील सर्वात श्रीमतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर झेप
  • बिल गेट्सला मागे टाकत पटकावले स्थान
  • बिल गेट्सने 20 अब्ज डॉलरचे दान करण्याचे ठरवल्यावर अदानींची आगेकूच

Gautam Adani world’s 4th richest : नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) आता फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत (world’s richest list)चौथ्या स्थानावर पोचले आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Microsoft founder Bill Gates)यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या विना नफा तत्वावर चालणाऱ्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला 20 अब्ज डॉलरची संपत्ती दान करणार असल्याचे सांगितल्यानंतर हे क्रमवारीतील हा बदल घडला आहे. (Gautam Adani becomes 4th richest man in the world after Bill gates donate $20 bn)

अधिक वाचा : Rupee at all-time low : रुपयाची घसरगुंडी थांबेना! पहिल्यांदाच पोचला 80 रुपये प्रति डॉलरच्या ऐतिहासिक नीचांकीवर

बिल गेट्सचे दान

एका ब्लॉगमध्ये, 66 वर्षीय बिल गेट्स यांनी उघड केले की त्यांनी आपली सर्व संपत्ती हळूहळू बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला देण्याची योजना आखली आहे. या फाउंडेशनची स्थापना त्यांनी आपल्या माजी पत्नीसह  केली होती. “माझे हे पैसे देणे म्हणजे त्याग नाही. मला या मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यात सहभागी होण्याचा बहुमान वाटतो. मी कामाचा आनंद घेतो आणि मला विश्वास आहे की माझे जीवन सुधारण्यासाठी सर्वात जास्त प्रभाव असलेल्या मार्गांनी माझी संसाधने समाजाला परत करणे माझे कर्तव्य आहे. मला आशा आहे की इतर असे लोक ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे आणि ज्यांचे अशा प्रकारचे विशेषाधिकार आङेत ते अशा प्रकारची पावले उचलण्यासाठी पुढे येतील. ”असे आपली मोठी घोषणा करताना बिल गेट्स म्हणाले आहेत. या घोषणेमुळे आणि संपत्ती दान केल्यामुळे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतील त्यांची क्रमवारी घसरणार आहे. फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेट्सची संपत्ती आता सुमारे 102 अब्ज डॉलर इतकी आहे.

अधिक वाचा : GST rate hike : जीएसटी दरात वाढ झाल्याने, काय महाग झाले आणि काय स्वस्त...पाहा यादी

गौतम अदानींची संपत्ती

दरम्यान, भारतीय उद्योगपती आणि अब्जाधीश गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सुमारे 114 अब्ज डॉलर असल्याचे नोंदवले गेले आहे. 2021 ते 2022 या वर्षादरम्यान, त्यांची एकूण संपत्ती 50 अब्ज डॉलरवरून वाढून तब्बल 90 अब्ज डॉलर इतकी झाली होती. गौतम अदानी हे अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा उद्योगसमूह सध्या भारतातील टॉप तीन समूहांपैकी एक आहे. अदानी समूहाचा विस्तार ऊर्जा, बंदरे आणि लॉजिस्टिक्स, खाणकाम आणि संसाधने, गॅस, संरक्षण आणि एरोस्पेस आणि विमानतळांच्या व्यवस्थापनाच्या व्यवसायात झालेला आहे. या उद्योग समूहात 197.49 अब्ज डॉलर (जुलै 19, 2022 पर्यंत) पेक्षा जास्त एकत्रित बाजार भांडवल असलेल्या सात सार्वजनिक सूचीबद्ध कंपन्या आहेत. त्याच्या प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात, या समूहाने भारतात नेतृत्वाचे स्थान मिळवले असल्याचे या समूहाच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 19 July 2022: सोन्याच्या भावात चढउतार, गुंतवणुकदारांमध्ये सोन्याबद्दल नकारात्मक कल, पाहा ताजा भाव

जगातील सर्वात श्रीमंतांची क्रमवारी

फेब्रुवारीमध्ये, 60-वर्षीय गौतम अदानींनी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला होता.फोर्ब्सच्या यादीत, इलॉन मस्क 230 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर लुई व्हिटॉनचे बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहेत. अॅमेझॉनचे बॉस जेफ बेझोस या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी