Richest Man : जगातील श्रीमंतांच्या यादीत अदानी 5 व्या क्रमांकावर तर अंबानी मात्र टॉप 10 मधून बाहेर

Bloomberg Billionaire Index : गौतम अदानींनी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत चांगलीच झेप घेतली आहे. देशातील दोन सर्वात मोठे अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या संपत्तीतील दरी पुन्हा वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या क्रमवारीत गौतम अदानी 5 व्या स्थानावर पोचले आहेत. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलर इतकी आहे. वार्षिक आधारावर, अदानीची संपत्ती (Gautam Adani Wealth) 32.7 अब्ज डॉलरने वाढली आहे.

World's Richest Man list
जगातील सर्वात श्रीमंतांची यादी 
थोडं पण कामाचं
  • जगातील श्रीमंतांच्या गौतम अदानींची टॉप 5 मध्ये मुसंडी
  • अदानी पाचव्या तर अंबानी मात्र 11 व्या क्रमांकावर
  • अदानी यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलरची आहे

Adani and Ambani Wealth : नवी दिल्ली : गौतम अदानींनी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत चांगलीच झेप घेतली आहे. देशातील दोन सर्वात मोठे अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या संपत्तीतील दरी पुन्हा वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या क्रमवारीत गौतम अदानी 5 व्या स्थानावर पोचले आहेत. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलर इतकी आहे. वार्षिक आधारावर, अदानीची संपत्ती (Gautam Adani Wealth) 32.7 अब्ज डॉलरने वाढली आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स, बर्नार्ड अर्नॉल्ट, जेफ बेझोस आणि इलॉन मस्क हे अदानींच्या पुढे आहेत. तर मुकेश अंबानी मात्र श्रीमंतांच्या यादीत पिछाडले आहेत. (Gautam Adani becomes the 5th richest man while Ambani ranks at 1th position) 

अधिक वाचा : GST Rate Hike :18 जुलैपासून महागाईचा मोठा झटका, अनेक वस्तूंवरील जीएसटी करात वाढ...पाहा कोणत्या वस्तू महागणार?

अंबानी टॉप 10 मधून बाहेर

एकीकडे गौतम अदानींनी श्रीमंतांच्या यादीत मुसंडी मारली आहे. तर त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे आणि ते टॉप 10 मधून बाहेर पडले आहेत. रँकिंगमध्ये 11व्या क्रमांकावर असलेल्या मुकेश अंबानी यांची संपत्ती 85.3 अब्ज डॉलर इतकी आहे आणि वर्षभरात 4.73 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे.

अधिक वाचा : SBI Interest rates : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे...बॅंकेकडून व्याजदरात 10 बीपीएसची वाढ

अदानींच्या कंपन्यांची घोडदौड

तुमच्या माहितीसाठी अदानी समूहातील दोन कंपन्यांचे म्हणजे अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत. अदानी समूहातील इतर कंपन्याही चांगली कामगिरी करत आहेत. त्याचवेळी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल सांगायचे तर, सरकारने निर्यातीवर कर लावण्याच्या निर्णयानंतर विक्रीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, शुक्रवारी रिलायन्समध्ये किंचित वाढ झाली आणि शेअरची किंमत 2401.55 रुपयांच्या पातळीवर होती.

अधिक वाचा : Ration Card: विवाहितांनी रेशन कार्डमध्ये ही माहिती लवकर करावी अपडेट...नाहीतर होईल नुकसान

अदानींची सिमेंट व्यवसायात एन्ट्री

अलीकडेच गौतम अदानींनी पायाभूत क्षेत्रातील सर्वात मोठा सौदा केला आहे. अदानी समूहाने (Adani Group) आता सिमेंट क्षेत्रात आपला विस्तार केला आहे. अदानी समूहाने स्विस कंपनी होल्सीम ग्रुपच्या (Holcim) सिमेंट कंपनी - अंबुजा सिमेंट्स लि. (Ambuja Cement) आणि एसीसी लि.चा (ACC Ltd) व्यवसाय विकत घेतला आहे. अदानींनी अंबूजा-एसीसी सिमेंटचा व्यवसाय तब्बल 10.5 अब्ज डॉलरना (80,000 कोटी रुपये) विकत घेतला आहे. या व्यवहारानंतर अदानी समूह आता सिमेंट व्यवसायील (Cement sector) सर्वात मोठी कंपनी बनणार आहे.

अदानी समूह आता भारताच्या 200 अब्ज डॉलर बाजारमूल्याच्या तीन सदस्यीय क्लबमध्ये सामील झाला आहे. अदानी ग्रुप व्यतिरिक्त या क्लबमध्ये रिलायन्स ग्रुप आणि टाटा ग्रुपचा समावेश आहे. अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप म्हणजे एकूण बाजारमूल्य आता 16 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. या कंपन्यांच्या शेअर्सनी बंपर परतावा देऊन गुंतवणुकदारांनादेखील श्रीमंत केले आहे. देशातील टॉप-10 कंपन्यांमध्ये अदानी ग्रीनचा समावेश झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी