Gautam Adani Update : गौतम अदानींची पीछेहाट...बर्नार्ड अर्नाल्ट आणि बेझॉसने टाकले मागे, अदानी चौथ्या क्रमांकावर

World Billionaire list : काही दिवसांपूर्वीच फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर पोचले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय ठरले होते. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. मात्र आता अदानी फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत दोन स्थानांनी खाली आले आहेत. तर भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आठव्या स्थानावर आहेत.

Gautam Adani wealth
गौतम अदानी चौथ्या स्थानावर घसरले 
थोडं पण कामाचं
  • जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या क्रमांकावर घसरले
  • बर्नार्ड अर्नाल्ट आणि जेफ बेझॉस अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्नानावर आले
  • मुकेश अंबनी आठव्या क्रमांकावर

Gautam Adani comes down to 4th position : नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मागील काही महिन्यांपासून तळपणारे नाव म्हणजे गौतम अदानी. अदानी समूहाचे चेअरमन असलेले गौतम अदानी (Gautam Adani)काही दिवसांपूर्वीच फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत (World's Richest list) दुसऱ्या स्थानावर पोचले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय ठरले होते. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. मात्र आता अदानींची पीछेहाट झाली आहे. गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत दोन स्थानांनी खाली आले आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेल्या गौतम अदानींनी फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) आणि ई-कॉमर्सचे दिग्गज, अॅमेझॉनचे संस्थापक, जेफ बेझॉस (Jeff Bezos) यांनी मागे टाकले आहे.  बर्नार्ड अर्नाल्ट आणि जेफ बेझॉस अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्नानावर आले आहेत. त्यामुळे गौतम अदानी चौथ्या स्थानावर फेकले गेले आहेत. (Gautam Adani falls to 4th position in world's richest list)

अधिक वाचा : Pakistani Airlines latest : एअर होस्टेसने विमानात योग्य अंडरगारमेंट परिधान करावे... पाकिस्तानी एअरलाइनचा विचित्र आदेश

अदानी चौथे तर अंबानी आठवे

श्रीमंतांच्या यादीनुसार, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk), 249.9 अब्ज डॉलर संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. त्यानंतर अर्नॉल्ट (142.2 अब्ज डॉलर), जेफ बेझॉस (138.2 अब्ज डॉलर) आणि गौतम अदानी (136 अब्ज डॉलर) यांचा क्रमांक आहे. भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 84.6 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह यादीत आठव्या स्थानावर आहेत.

अधिक वाचा : Fake identity for sim: व्हॉट्सअपवर खोटं नाव सांगितलं तर पडेल दंड, होईल तुरुंगवास!

अदानींची घोडदौड

गौतम अदानी (Gautam Adani) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. टाइम्सच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमधले एकमेव भारतीय असण्यापासून ते भारतातील सर्वात श्रीमंत होण्यापर्यंत अनेक किताब त्यांनी पटकावले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या उद्योगपतीच्या संपत्तीत आणि उद्योगसमूहामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अनेक घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर अस्थिर शेअर बाजारात मोठी धावपळ झाली. परिणामी भारतीय शेअर बाजारातील अनेक शेअर्सनी घसरण नोंदवली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम झाला आहे.  

अधिक वाचा : WhatsApp Update : घरबसल्या WhatsApp वरून डाउनलोड करा तुमचे आधार आणि पॅन कार्ड...पाहा सोपी पद्धत

अदानी समूह

अदानी समूहाच्या (Adani Group) अनेक कंपन्या विस्तार करत आहेत. हा समूह ऊर्जा, बंदरे, वायू, विमानतळ, वीजवितरण यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. अदानींच्या डझनभर कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झालेली आहे. अलीकडे अदानी यांनी जाहीर केले की समूह पुढील 10 वर्षांत 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यापैकी 70 टक्के गुंतवणूक हरित ऊर्जा क्षेत्रात केली जाणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहानंतर आता अदानी समूह हा देशातील तिसरा सर्वात मोठा समूह आहे. या समूहाच्या BSE वर अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मार आणि अदानी ट्रान्समिशन या सात कंपन्या सूचीबद्ध आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी