Loan to Adani : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Richest Businessman) असणाऱ्या गौतम अदानींच्या कंपनीने (Gautam Adani Group) आता एका नव्या कर्जासाठी (Loan) अर्ज (Application) केला आहे. गुजरातच्या (Gujrat) मुंद्रामध्ये (Mundra) एक नवा प्रकल्प (New Project) उभा करण्यासाठी गौतम अदानी समूहाला 14 हजार कोटी (14 thousand crore) रुपयांची गरज आहे. त्यासाठी कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाशी (SBI) संपर्क साधला असून कर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा एकंदर प्रकल्प 19 हजार कोटींचा असल्याची माहिती आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने या कर्जाला तत्वशः मंजुरी दिली आहे. मात्र 14 हजार कोटींच्या कर्जापैकी 5 हजार कोटी रुपये हे अदानी ग्रुपला एसबीआयकडेच ठेवावे लागतील, अशी ती अट आहे. याबाबत माध्यमांना कुठलीही औपचारिक माहिती मात्र अद्याप देण्यात आलेली नाही. एसबीआय आणि अदानी ग्रुप दोघांनीही सध्या या विषयावर भाष्य न करणंच पसंत केल्याचं चित्र आहे.
नवी मुंबईतील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळासंबंधी एका योजनेसाठी अदानी ग्रुपनं नवी मार्च महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतलं होतं. अदानी ग्रुपशी संबंधित असणाऱ्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एसबीआयकडून 12,770 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.
अधिक वाचा - Benefits of ITR filing : तुमची कमाई 2.5 लाखांपेक्षा कमी असली तरीही प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचे 3 फायदे...
कोळशापासून पॉलिविनाईल क्लोराइड तयार करण्याची ही योजना आहे. मुंद्रामध्ये एका पॉलिकेमिकल क्लस्टर तयार करण्याच्या अदानी ग्रुपच्या योजनेचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचं मानलं जात आहे. दरवर्षी 2000 किलो टन एवढी या प्रकल्पाची क्षमता असणार आहे. इमल्शन पीव्हीसी, सस्पेंशन पीव्हीसी आणि क्लोरीनयुक्त पीव्हीसी ही या प्रकल्पातून बाहेर पडणारी प्रमुख उत्पादनं असणार आहेत. मुंद्रा प्रकल्पात टप्प्याटप्प्याने 20 लाख मेट्रिक टनांची उत्पादन क्षमता वाढवण्यात येणार असल्याचं कंपनीकडून 2021-22 च्या वार्षिक अहवालात नमूद केलं होतं. 2000 केटीपीएची ही योजना पहिल्या टप्प्यात परिपूर्ण होईल आणि 2024 पासूनच कार्यान्वित होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अदानी ग्रुपची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून कंपनीने आपलं लक्ष यात गुंतवलं आहे. भविष्यात हा देशातील सर्वात मोठा आणि यशस्वी प्रकल्प म्हणून नावारुपाल आणण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. त्यासाठी कंपनीने आतापर्यंत 6,071 कोटी रुपये उभे केले आहेत आणि अधिकची रक्कम कर्ज स्वरुपात घेतली जाणार आहे. यातून अनेक नवे रोजगार उभे राहतील आणि देशाच्या उत्पादन क्षमतेतही प्रचंड वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.