World's Richest Person : गौतम अदानींची घोडदौड, आता जगातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, तर मुकेश अंबानी घसरले 11व्या स्थानी

World's Richest List : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani)यांची तुफानी घोडदौड सुरूच आहे. ब्लूमबर्गच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index), अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदानी यांची संपत्ती(Gautam Adani Wealth) आता 109 अब्ज डॉलरवर पोचली आहे. तर रिलायन्सच्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) मात्र 11 व्या स्थानावर घसरले आहेत.

Gautam Adani & Mukesh Ambani Wealth
गौतम अदानी आणि मुकेश अंबानींची संपत्ती 
थोडं पण कामाचं
  • ्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलर इतकी आहे.
  • अदानी पॉवरच्या समभागाने एका महिन्यात 120% वाढ नोंदवली आणि याच कालावधीत अदानी विल्मरच्या शेअरमध्ये 87% पेक्षा जास्त वाढ झाली
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आता जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Gautam Adani Wealth : नवी दिल्ली : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani)यांची तुफानी घोडदौड सुरूच आहे. ब्लूमबर्गच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index), अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदानी यांची संपत्ती(Gautam Adani Wealth) आता 109 अब्ज डॉलरवर पोचली आहे. तर रिलायन्सच्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) मात्र 11 व्या स्थानावर घसरले आहेत. गौतम अदानी यांनी या संपत्तीसह, ओरॅकलचे लॅरी एलिसन आणि मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर यांना मागे टाकत आता जगातील आठव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचे स्थान पटकावले आहे. या वर्षी अदानीच्या एकूण संपत्तीत 32 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही वाढ सर्वोच्च श्रीमंतांच्या एका वर्षातील संपत्तीच्या यादीत सर्वाधिक आहे. अदानी समूहात बंदरे आणि एरोस्पेसपासून ते थर्मल एनर्जी आणि कोळशापर्यंतच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आहेत. (Gautam Adani is now 8th richest person in world, while Mukesh Ambani slipped at 11th position)

अधिक वाचा : Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल! तुमच्यावर होणार थेट परिणाम, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

अदानी पुढे तर अंबानी पिढाडले

एकीकडे अदानींची जबरदस्त घोडदौड सुरू आहे. अदानींनी श्रीमंतांच्या यादीत आठवे स्थान पटकावताना ओरॅकलचे लॅरी एलिसन आणि मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर यांना मागे टाकले आहे. तर त्या तुलनेत मुकेश अंबानी मात्र पिढाडले आहेत. अदानींनी श्रीमंतांच्या यादीत झेप घेतली आहे तर त्याउलट रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 97.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह निर्देशांकात 11व्या स्थानावर घसरले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सनुसार त्यांनी या वर्षात आतापर्यंत त्यांच्या संपत्तीमध्ये 7.72 अब्ज डॉलरची भर घातली आहे.

अधिक वाचा : EPFO Update: मोठी बातमी! या तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या कसे तपासायचे

अदानींनी भल्या भल्यांना टाकले मागे

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अदानी समूहाचे प्रमुख 109.8 अब्ज डॉलर संपत्तीसह 8व्या स्थानावर आहेत. 59 वर्षीय भारतीय उद्योगपती त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे थोड्याच काळात सहाव्या स्थानावर पोचले होते. मात्र ते लवकरच फोर्ब्सच्या निर्देशांकात 9व्या क्रमांकावर परतले. मुकेश अंबानी यांनी 98.8 अब्ज डॉलर संपत्तीसह फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11 वे स्थान कायम राखले आहे. गेल्या काही महिन्यांत, अदानी आणि अंबानी काही अब्जाधीश निर्देशांकांमध्ये अव्वल स्थानासाठी स्थान बदलत आहेत.

अधिक वाचा : Railway Ticket : आता ना स्टेशनला जावं लागणार ना एजंटला जास्त पैसे मोजावे लागणार, पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार कन्फर्म ट्रेन तिकीट!

ग्रीन एजर्नीमध्ये अंबानी आणि अदानींची गुंतवणूक

अंबानी आणि अदानी हे दोघेही पुढील दशकासाठी नियोजित कोट्यवधी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह हरित ऊर्जा क्षेत्रात भारताचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान अदानी पॉवरचा शेअर एका महिन्यात 120 टक्क्यांहून अधिक वाढला आहे आणि याच कालावधीत अदानी विल्मरच्या शेअरच्या किंमतीत तब्बल 87 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

अदानी समूह आता भारताच्या 200 अब्ज डॉलर बाजारमूल्याच्या तीन सदस्यीय क्लबमध्ये सामील झाला आहे. अदानी ग्रुप व्यतिरिक्त या क्लबमध्ये रिलायन्स ग्रुप आणि टाटा ग्रुपचा समावेश आहे. अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप म्हणजे एकूण बाजारमूल्य आता 16 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. या कंपन्यांच्या शेअर्सनी बंपर परतावा देऊन गुंतवणुकदारांनादेखील श्रीमंत केले आहे. देशातील टॉप-10 कंपन्यांमध्ये अदानी ग्रीनचा समावेश झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी