5G services | ५ जी सेवेच्या स्वागताला व्हा तयार, पुढील वर्षी १३ शहरात होणार सुरू

5G services testing | ३१ डिसेंबर २०२१ पर्यत ५ जी चाचणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशात लवकरच ५ जी सेवांचे (5G)वारे वाहण्यास सुरूवात होणार आहे. एका अधिकृत वक्तव्यानुसार एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन आयडियासह (Vodafone Idea) इतर ऑपरेटर्सनी गुरुग्राम, बंगळूरू, कोलकाता, मुंबई, चंडीगढ, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनौ, पुणे आणि गांधीनगर या शहरांमध्ये ५ जी चाचणी केंद्र सुरू केलेले आहेत.

5G services in India
भारतात सुरू होणार ५ जी सेवा 
थोडं पण कामाचं
  • देशात लवकरच सुरू होणार अत्याधुनिक ५ जी सेवा
  • ५ जी सेवांची चाचणी ३१ डिसेंबर २०२१ पर्यत पूर्ण होणार
  • सुरूवातीला देशातील मोठ्या १३ शहरात सुरू होणार ५ जी सेवा

5G services in India| नवी दिल्ली : दूरसंचार विभागासाठी महत्त्वाची असणारा ५ जी चाचणी प्रकल्प (5G test bed project) आता शेवटच्या टप्प्यात पोचला आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यत ५ जी चाचणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशात लवकरच ५ जी सेवांचे (5G)वारे वाहण्यास सुरूवात होणार आहे. एका अधिकृत वक्तव्यानुसार एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन आयडियासह (Vodafone Idea) इतर ऑपरेटर्सनी गुरुग्राम, बंगळूरू, कोलकाता, मुंबई, चंडीगढ, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनौ, पुणे आणि गांधीनगर या शहरांमध्ये ५ जी चाचणी केंद्र सुरू केलेले आहेत. या महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये सर्वात आधी ५ जी सेवा सुरू होणार आहेत. (5G services | Get ready for 5G services, next year in 13 big cities services will begun)

५ जी सेवा चाचणी शेवटच्या टप्प्यात

दूरसंचार विभागाने २०२१ या वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल माहिती देताना सांगितले की भारतात विविध भागात मोबाइल टॉवरची उभारणी करण्याबरोबरच दूरसंचार क्षेत्रावरील वित्तीय दबाव दूर करण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. दूरसंचार क्षेत्रातील प्रत्यक्ष परकी गुंतवणक २०१४ ते २०२१ या कालावधीत १५० टक्क्यांनी वाढून १,५५,३५३ कोटी रुपयांवर पोचली आहे. २०००२ ते २०१४ दरम्यान ही गुंतवणूक ६२,३८६ कोटी रुपये होती. दूरसंचार विभागासाठी आर्थिकदृष्टया महत्त्वाची असणारी ५ जी चाचणी योजना शेवटच्या टप्प्यात पोचली आहे.

५ जी चाचणीमध्ये आयआयटीचे मोठे योगदान

५ जी चाचणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या ८ संस्था आहेत. यात आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगळूरू, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग अॅंड रिसर्च आणि सेंटर फॉर एक्सेलेन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी या संस्था ३६ महिन्यांपासून यासंदर्भात काम करत आहेत.

२२४ कोटी रुपयांचा प्रकल्प

५ जी चाचणी प्रकल्प हा जवळपास २२४ कोटी रुपयांचा खर्च असणारा प्रकल्प आहे. ५ जी चाचणी प्रकल्प ३१ डिसेंबर २०२१ पर्यत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे देशात ५ जी उपकरणे आणि नेटवर्क उपकरणे यांच्या वापराचा मार्ग मोकळा होणार आहे.

मोबाइल फोनचे जग बदलणार

५ जी सेवा कार्यरत झाल्यानंतर मोबाइल फोनचे जगच बदलून जाणार आहे. एका अंदाजानुसार ५ जी सेवांचा वेग ४ जी सेवांपेक्षा १० पट जास्त आहे. ५ जी सेवांची सुरूवात झाल्यानंतर डिजिटल क्रांतीला वेगळेच परिमाण मिळणार आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे. ई-गव्हर्नन्स सेवांचा विस्तार होईल. ज्या प्रकारे कोरोना संकटकाळात देशातील प्रत्येकजण इंटरनेट सेवांवर अवलंबून होता, हे लक्षात ५ जी सेवा आल्यानंतर नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी आणि सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होणार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी