पाच रुपयाची नोट असल्यास ३० हजार रुपये कमावण्याची संधी

तुमच्याकडे पाच रुपयांची नोट आहे का?.... ही नोट तुम्हाला घरबसल्या ३० हजार रुपये कमावण्याची संधी मिळवून देऊ शकते...

Get Rs 30000 in exchange of 5 rupee note here's how
पाच रुपयाची नोट असल्यास ३० हजार रुपये कमावण्याची संधी 
थोडं पण कामाचं
  • पाच रुपयाची नोट असल्यास ३० हजार रुपये कमावण्याची संधी
  • एक रुपयाची नोट असल्यास ४५ हजार रुपये कमावण्याची संधी
  • घरबसल्या कमाईची संधी

मुंबईः तुमच्याकडे पाच रुपयांची नोट आहे का?.... ही नोट तुम्हाला घरबसल्या ३० हजार रुपये कमावण्याची संधी मिळवून देऊ शकते... यासाठी फक्त एक छोटी कृती करावी लागेल... आपल्याकडे असलेली पाच रुपयांची नोट दुर्मिळ असल्याची खात्री करुन घ्यावी लागेल.... होय. https://www.coinbazaar.in/ या वेबसाइटला एकदा भेट द्या. या ठिकाणी दुर्मिळ नोटा आणि नाणी यांची खरेदी-विक्री केली जाते. जर तुमच्याकडे असलेल्या पाच रुपयांच्या नोटेवर शेतकरी ट्रॅक्टर चालवत असल्याचे पाठमोरे चित्र असेल आणि नोटेच्या क्रमांकात कुठेही ७८६ हा आकडा सलग येत असेल तर ही नोट विकून घरबसल्या ३० हजार रुपये कमावण्याची संधी आहे. Get Rs 30000 in exchange of 5 rupee note here's how

इस्लाम धर्मियांमध्ये ७८६ हा आकडा अतिशय पवित्र समजला जातो. यामुळेच अनेक इस्लामचे पालन करणारे नागरिक पाच रुपयांच्या नोटेवर शेतकरी ट्रॅक्टर चालवत असल्याचे पाठमोरे चित्र असेल आणि नोटेच्या क्रमांकात कुठेही ७८६ हा आकडा सलग येत असेल तर ही नोट खरेदी करुन स्वतःजवळ जपणे पवित्र समजतात. या नोटेमुळे भाग्य उजळते, अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात अशा स्वरुपाचा विश्वास वाटत असल्यामुळे त्यांचा ही नोट खरेदी करण्याकडे जास्त कल आहे.

पाच रुपयांच्या नोटेप्रमाणेच एक रुपयाच्या दुर्मिळ नोटेला कॉइन बझारच्या वेबसाइटवर मागणी आहे. जर तुमच्याकडे १९७७ ते १९७९ या काळातील एक रुपयाची नोट असेल आणि त्यावर तत्कालीन केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे प्रधान सचिव हिरुभाई एम. पटेल यांची स्वाक्षरी असेल तर ही नोट विकून घरबसल्या ४५ हजार रुपये कमावण्याची संधी आहे. 

अलिकडच्या काळात भारत सरकारने एक रुपयाच्या नोटांची छपाई थांबवली. नाण्यांच्या टाकसाळीतून आवश्यकतेनुसार नाणी पाडण्यावर भर दिला. पण त्या काळात इतर नोटा छापखान्यात आणि नाणी टाकसाळीत तयार केली जात होती. नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन गव्हर्नरची स्वाक्षरी असायची. फक्त एक रुपयाच्या नोटेवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या प्रधान सचिवांची स्वाक्षरी असायची. यामुळेच एक रुपयाच्या दुर्मिळ नोटेला मागणी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी