आईला द्या आरोग्य विम्याची भेट

Gift your mother a health insurance policy this Mother's Day : आईच्या तब्येतीच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि तिला आवश्यकतेनुसार लगेच वैद्यकीय मदत घेणे सोपे यासाठी आईच्या नावाने आरोग्य विमा घेणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.

Gift your mother a health insurance policy this Mother's Day
आईला द्या आरोग्य विम्याची भेट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आईला द्या आरोग्य विम्याची भेट
  • आईच्या नावाने आरोग्य विमा घेण्याचे पाच प्रमुख फायदे
  • उपचारांसाठी खिशावर ताण येणार नाही

Gift your mother a health insurance policy this Mother's Day : आई कोणतीही अट न घालता आणि कोणतीही अपेक्षा न बाळगता आयुष्यभर प्रेम करते. आजारपण, चिंता, ताणतणावात आई ठामपणे पाठीशी उभी राहते. यामुळेच आई हा एक भक्कम आधार आहे. पण जसे वय होत जाते तसे आईच्या तब्येतीच्या समस्या निर्माण होऊ लागतात. तरुणपणी उत्साहाने अनेक जबाबदाऱ्या सहजतेने एकदम हाताळणाऱ्या आईल वय वाढू लागल्यावर काम करताना थकवा जाणवतो. आईच्या हालचाली मंदावतात. आईच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. वयाच्या या टप्प्यावर आईला वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासते. ही गरज आधीच ओळखून आपल्या आईसाठी मातृदिनाच्या (Mother's Day / मदर्स डे) मुहूर्तावर एक आरोग्य विमा घ्या आणि तो लाडक्या आईला भेट द्या. आईसाठी मुद्दाम वेळ काढा. आईसोबत गप्पा मारा, तिला तिच्या दैनंदिन कामात मदत करा. आईच्या आरोग्यासाठी आरोग्य विमा आणि आईच्या आनंदासाठी तुम्ही आईला वेळ देणं या दोन गोष्टी 'मदर्स डे'च्या निमित्ताने करा.

आईला द्या 'मदर्स डे'च्या शुभेच्छा

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

आईसाठी महत्त्वाचा आरोग्य विमा

आई आयुष्यभर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटत असते. यामुळे आईला तिच्या उतारवयात आरोग्य विमा भेट देणे आवश्यक आहे. आईच्या तब्येतीच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि तिला आवश्यकतेनुसार लगेच वैद्यकीय मदत घेणे सोपे यासाठी आईच्या नावाने आरोग्य विमा घेणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.

आईच्या नावाने आरोग्य विमा घेण्याचे पाच प्रमुख फायदे

१. हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची सोय

असा आरोग्य विमा घ्यावा ज्यात आई ज्या गावात किंवा शहरात वास्तव्यास आहे त्या ठिकाणच्या तसेच देशातील प्रमुख शहरांतील जास्तीत जास्त हॉस्पिटलचा समावेश आहे. आरोग्य विम्याशी संलग्न हॉस्पिटलचे नेटवर्क मोठे असल्यास आईला उपचार घेण्यासाठी अनेक हॉस्पिटलचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. कॅशलेस विमा असल्यास खिशात आणीबाणीच्यावेळी पैसे नसले तरी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणे शक्य होईल. उपचारांसाठी खिशावर ताण येणार नाही.

२. आधीपासून असलेल्या आजारांसाठी विमा संरक्षण

काही वेळा आईला आधीपासून एखादा आजार असण्याची शक्यता असते. अशा वेळी आधीपासून असलेल्या आजाराला विमा संरक्षण देणारा आरोग्य विमा लाभदायी ठरतो. आधीपासून असलेले तसेच नव्याने झालेला किंवा झालेले आजार यांच्यासाठी विमा संरक्षण मिळाल्यामुळे आईला अनेक प्रकाराच्या आजारांसाठी उपचार करुन घेणे सोपे होते. वैद्यकीय उपचारांसाठी खिशावर ताण येत नाही. लक्षात ठेवा आधीपासूनच्या आजारांसाठी विमा संरक्षण घेण्याकरिता जास्त विमा हप्ता म्हणून (प्रीमियम) जास्त पैसे भरावे लागतात. काही विमा कंपन्या विमा घेतल्यानंतर दीड किंवा दोन वर्षांनंतर जुन्या आजारांसाठीचे अथवा निवडक आजारांसाठीचे विमा संरक्षण देतात आणि इतर आजारांसाठी विमा संरक्षण विमा खरेदी केल्यापासून उपलब्ध असते. यामुळे कोणता विमा लाभदायी हे बघून विमा खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

३. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याआधी आणि नंतर मिळणारे विमा संरक्षण

अनेक आरोग्य विमा योजना हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त विशिष्ट दिवसांपर्यंत विमा संरक्षण पुरवतात. अनेक आजारांसाठी घरच्या घरीच औषधांद्वारे उपचार शक्य असतात. परिस्थिती हाताबाहेर गेली तरच हॉस्पिटलमध्ये जावे लागते. यामुळे फक्त हॉस्पिटलच्या ओपीडीत जाऊन तपासणी करणे, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या उपचारपद्धती यांचा आरोग्य विम्यात समावेश आहे का हे तपासून विमा खरेदी करा. जास्तीत जास्त लाभ मिळवले तर आईला वैद्यकीय उपचारांच्यावेळी अनेक पर्याय उपलब्ध असतील. डॉक्टरांच्या चिठ्ठीद्वारे मिळणारी औषधे आणि केला जाणारा उपचार, रुग्णवाहिका सेवेचा खर्च हे पर्याय खरेदी केलेल्या विम्यात अंतर्भूत असतील तर आरोग्य विमा आईसाठी जास्त लाभदायी ठरेल.

४. आरोग्य विम्याचे आर्थिक लाभ

हल्ली वैद्यकीय उपचारांवरील खर्चात वाढ होऊ लागली आहे. या परिस्थितीत आरोग्य विम्यामुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च विम्यामार्फत भरून निघाला तर आजारपणामुळे आर्थिक गणित कोलमडत नाही. अनेक हॉस्पिटल कॅशलेस विम्याचे संरक्षण पुरवतात. यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ आली तरी उपचारांसाठी खर्च करावा लागत नाही. आईसाठी हे पर्याय फायद्याचे आहेत.

५. इतर फायदे

अनेक कंपन्या आरोग्य योजना, मोफत रुग्णवाहिका, दिवसभर घरी नर्सिंग करण्यासाठी होणार डे केअरचा खर्च, विनामूल्य आरोग्य तपासणी आणि लसीकरण या सेवांचा भार उचलतात. यामुळे वैद्यकीय उपचार करुन घेण्यासाठी, आरोग्य तपासण्या करण्यासाठी आईला किंवा तुम्हाला खर्च करावा लागणार नाही. खिशावर वैद्यकीय उपचारांचा ताण पडणार नाही. काही कंपन्या तर महागड्या तपासण्या आणि एक्स रे, सीटी स्कॅन, फुल बॉडी स्कॅन, एमआरआय तसेच महागड्या आरोग्य तपासण्यांचाही खर्च करतात. यामुळे आईला आर्थिक चिंता न करता वैद्यकीय उपचार घेणे शक्य होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी