Mother's Day 2022: या 'मदर्स डे' ला, आईला द्या या 5 'अर्थ'पूर्ण भेट, तिचे म्हातारपण होईल सुखाचे...

Financial Planning for Mother : आज माणूस आपल्या करिअरमध्ये इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आई-वडिलांकडे लक्ष देता येत नाही किंवा अडचणी पाहता येत नाहीत. तुम्ही अजून म्हातारे झाले नसले तरी तुमच्या आईवडिलांच्या हाती खूप वर्षे नाहीत. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा एक मोठा कालखंड संघर्षात घालवलेला असतो. त्यातही आपली आई (Mother) आयुष्यभर कोणतीही तक्रार न करता आपल्या इच्छा आकांक्षांचा बळी देत फक्त आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी झिजत असते. अशावेळी आईचे म्हातारपण सुखी, आरामदायक होणे आवश्यक आहे.

Financial Planning for Mother
आईला द्या या 5 'अर्थ'पूर्ण भेट 
थोडं पण कामाचं
  • आई आयुष्यभर कुटुंबालाच प्राधान्य देते, अशात म्हातारपणात येणाऱ्या अडचणींकडे दुर्लक्ष होते
  • आईसाठी करा चांगले आर्थिक नियोजन
  • या मदर्स डे ला आईला आर्थिक बाबींशी निगडीत द्यायच्या भेट जाणून घ्या

Financial stability for Mother : नवी दिल्ली : आज माणूस आपल्या करिअरमध्ये इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आई-वडिलांकडे लक्ष देता येत नाही किंवा अडचणी पाहता येत नाहीत. जर तुम्ही चांगल्या भविष्यासाठी धडपडत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या पालकांनीही (Parents) तुमच्यासोबत संघर्ष करावा. तुम्ही अजून म्हातारे झाले नसले तरी तुमच्या आईवडिलांच्या हाती खूप वर्षे नाहीत. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा एक मोठा कालखंड संघर्षात घालवलेला असतो. त्यातही आपली आई (Mother) आयुष्यभर कोणतीही तक्रार न करता आपल्या इच्छा आकांक्षांचा बळी देत फक्त आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी झिजत असते. अशावेळी आईचे म्हातारपण सुखी, आरामदायक होणे आवश्यक आहे. आईला आयुष्याचा शेवटचा टप्पा आनंदात घालवता आला पाहिजे. अशा परिस्थितीत आईच्या किंवा आपल्या पालकांच्या आर्थिक भविष्याची (Financial Stability) चिंता करणे ही आपली जबाबदारी आहे. आज मदर्स डे (Mother's Day आहे. या 'मदर्स डे'ला तुम्ही तुमच्या आईला असे काही गिफ्ट देऊ शकता, ज्यामुळे तिचे आर्थिक भविष्य सुरक्षित होईल. चला जाणून घेऊया. (Give these 5 gifts regarding financial stability to your mother on Mother's Day)

अधिक वाचा : Cinema Halls | ग्राहकांकडून जास्त पैसे घेणे सिनेमागृहाला पडले महागात... 60 रुपयांसाठी मोजावे लागणार 40 हजार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

आपल्या आईसाठी आर्थिक नियोजन (Financial Planning for Mother) करत तिचे भविष्य आर्थिकदृष्ट्या असे स्थिर आणि सुरक्षित करा.

1. आईसाठी आपत्कालीन निधी तयार करा

माता त्यांच्या कुटुंबाच्या गरजांना नेहमीच प्राधान्य देतात. त्या स्वत:च्या आर्थिक सुरक्षिततेकडे अजिबात लक्ष देत नाहीत. म्हणून, त्यांच्यासाठी आपत्कालीन निधी तयार करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.  जेणेकरुन त्या संकटात येऊ शकणार्‍या कोणत्याही अनपेक्षित घटनेला धैर्याने तोंड देऊ शकतील. त्यांच्याकडे आपत्कालीन निधीमध्ये किमान 3 ते 6 महिन्यांचा खर्च असावा, जो त्यांच्या सोयी लक्षात घेऊन एटीएम/डेबिट कार्ड असलेल्या बचत बँक खात्यात जमा करणे अधिक श्रेयस्कर असेल. या व्यतिरिक्त, हे पैसे FD मध्ये देखील ठेवता येतात, जेणेकरून ते कालांतराने वाढतात, कारण बहुतेक FD आवश्यक असल्यास वेळेपूर्वी पैसे काढता येतात.  अर्थात यात व्याजाचे नुकसान होऊ शकते, परंतु ती रक्कम सुरक्षित असते.

2. आईसाठी आरोग्य विमा संरक्षण

वैद्यकीय आणीबाणी आणि प्रचंड वैद्यकीय खर्च लक्षात घेऊन आरोग्य विमा योजना घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही अद्याप तो घेतला नसेल, तर लवकरात लवकर विमा काढण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आईचा लाभार्थी म्हणून समावेश करायला विसरू नका. जर तुम्ही महानगरात राहत असाल तर किमान 5 ते 7 लाखांचे विमा कवच घ्यायला हरकत नाही. यामध्ये तुमचे पालक दोघेही कव्हर होतील. याशिवाय, गंभीर आजार संरक्षण, हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि पोस्ट कव्हर, डोमिसिलरी एक्सपेन्स कव्हर इत्यादीसारख्या महत्त्वाच्या अॅड-ऑन वैशिष्ट्यांचा समावेश करण्याचा विचार करा.

अधिक वाचा : Elon Musk | इलॉन मस्कने सौदी प्रिन्सला ट्विटरवर विचारले दोन प्रश्न आणि प्रिन्सने घेतला युटर्न... सौदी प्रिन्सने दिले हे उत्तर

3. ज्येष्ठ नागरिक बचत बँक खाते उघडा

तुमच्या आईचे वय ६० पेक्षा जास्त असल्यास, ज्येष्ठ नागरिक बचत खाते हे तिचे आपत्कालीन निधी किंवा मुख्य बचत निधी ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण असू शकते. आजकाल, बर्‍याच बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत खाती उपलब्ध आहेत जिथे बचत आणि मुदत ठेवी सामान्य खात्यांपेक्षा जास्त व्याज दर देतात. अनेक ज्येष्ठ नागरिक बचत खाती अतिरिक्त फायदे आणि भत्त्यांसह येतात. यात वैद्यकीय विमा आणि वैयक्तिक अपघात विमा, मोफत खरेदी संरक्षण, कमी ओपनिंग डिपॉझिट आणि इतर विशेष ऑफर देखील मिळतात.

4. सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक 

तुम्ही सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. कारण एरवी महिलांना सोन्यामध्ये स्वारस्य असते.  परंतु सोने खरेदी करणे आणि ठेवणे खूप जोखमीचे आहे. शिवाय, सोन्याच्या दागिन्यांवर आकारल्या जाणार्‍या मेकिंग चार्जेसमुळे, त्याचे रिटर्न व्हॅल्यू खूपच कमी आहे आणि त्याच्या शुद्धतेच्या चिंतेपासून कोणीही सुटू शकत नाही. याशिवाय बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. त्यामुळे पुढच्या वेळी तुमची आई सोने खरेदी करण्याचा विचार करत असेल, तेव्हा तिला सोने खरेदी करण्याऐवजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या सार्वभौम गोल्ड बाँड्स (SGB) मध्ये गुंतवणूक करण्यास सांगा.

अधिक वाचा : Interest rates | व्याजदरातील वाढ होण्यास सुरूवात... आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने बॅंकांनी वाढवले व्याजदर

5. निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवणूक करणे

वृद्ध गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवणूक करावी, ज्यामुळे त्यांना हमी परतावा मिळू शकेल आणि जास्त जोखीम नसेल. ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये अधिक व्याज मिळते. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि शॉर्ट टर्म डेट फंड हे ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहेत. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, प्रत्येक गुंतवणुकीच्या साधनाच्या अटी व शर्ती नीट वाचायला विसरू नका. यामुळे त्या साधनांवरील परतावा त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत आहे की नाही याची कल्पना येईल.

या सर्वांव्यतिरिक्त कागदपत्रांविषयीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.तुमची आई तुमच्या वडिलांची, तुमच्या भावंडांची आणि तुम्ही स्वतः सुरू केलेल्या असंख्य गुंतवणूक आणि विमा पॉलिसींची नॉमिनी असेल हे स्वाभाविक आहे. पण त्यांना या सर्व गुंतवणुकीची आणि विमा पॉलिसींची माहिती असायला हवी. त्यांना त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये प्रवेश असायला हवा आणि गुंतवणूकदार किंवा पॉलिसीधारकाला काही घडल्यास गुंतवणुकीच्या रकमेवर किंवा विमा रकमेवर दावा करण्याच्या प्रक्रियेची त्यांना माहिती असली पाहिजे. त्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींची माहिती द्या, जेणेकरून त्यांना नंतर कोणतीही अडचण येऊ नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी