Godrej Food Trends : मुंबई : भारतीय माणूस हा पारंपारिक गोष्टींना महत्त्व देणारा आणि परंपरेमध्ये रमणारा आहे. यात आहार, खाद्य पदार्थ (Indian Food Tradition)यांचादेखील समावेश आहे. आपल्या देशात हजारो खाद्यपदार्थ आहेत. प्रत्येक राज्यात, विभागात वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत, खाण्याच्या सवयी आहेत. गोदरेज फूड्स ट्रेंडद्वारे खाद्यपदार्थांच्या याच ट्रेंडचा मागोवा घेण्याचा आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Godrej Industries) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. नादिर गोदरेज (Nadir Goderj) यांनी भारतातील पाककला क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत गोदरेजच्या फूड ट्रेण्ड्स अहवालाच्या पाचव्या पर्वाचे अनावरण केले. 2018 मध्ये वार्षिक उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या 'गोदरेज फूड्स ट्रेण्ड्स रिपोर्ट 2022 (Godrej Food Trends report-2022) – कलेक्टर्स एडिशन'मध्ये २०० हून अधिक विचारवंत एकत्र आले. यामध्ये सेलिब्रिटी शेफ्स, घरगुती शेफ्स, व्यावसायिक शेफ्स, फूड ब्लॉगर्स, आरोग्य व्यावसायिक, मीडिया व्यावसायिक, मिक्सोलॉजिस्ट, पोषणतज्ञ, रेस्टॉरटर्स, सॉमेलियर्स, अन्न उत्पादक अशा व्यक्तींचा समावेश होता. या सर्वांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रांमधील कौशल्याबाबत सखोल माहिती सांगितली. (Godrej Food Trends report-2022 says majority of Indian are in search of foods that are related to culture)
अधिक वाचा : Diabetes : डायबिटीज रूग्ण असाल तर उपाशी पोटी खा ‘ही’ 5 प्रकारची पाने; शुगर राहील नियंत्रणात
अधिक वाचा : Bank holidays in May 2022 | मे महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार...पाहा संपूर्ण यादी
गोदरेज फूड्स ट्रेण्ड्स रिपोर्टबाबत बोलताना गोदरेजच्या कार्यकारी संचालक व प्रमुख ब्रॅण्ड अधिकारी तान्या दुबाश म्हणाल्या, ''मला गोदरेज फूड ट्रेण्ड्स रिपोर्टच्या 2022 कलेक्टर्स एडिशनला सादर करण्याचा आनंद होत आहे. आहार उद्योगामधील सर्वोत्तम विचारवंतांना एकत्र आणण्याचा आणि आहार क्षेत्रामध्ये उदयास येणा-या ट्रेण्ड्सना त्यांच्या सहयोगाने ओळखण्याची इच्छा राहिली आहे.'' त्या पुढे म्हणाल्या, ''समोर आलेल्या निष्कर्षांनुसार 2022 हे वर्ष आरोग्यदायी सेवनासाठी ओळखले जाईल. उदयास आलेल्या काही इतर प्रमुख ट्रेण्ड्समधून आपल्या मूळ पाककलांचा पुन्हा शोध घेतला जाईल, स्थानिकांना पाठिंबा आणि सर्व भारतीय गोष्टींचा अभिमान बाळगणे दिसून येते. पारंपारिक आहार यंत्रणा, पाककला पद्धतींमधील अंतर्गत कौशल्य आणि आपण सेवन करत असलेल्या आहारासोबत सखोल संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित असेल.''
परफेक्ट बाईट कन्सल्टिंगच्या व्यवस्थापकीय संचालक आणि गोदरेज फूड्स ट्रेण्ड्स रिपोर्ट 2022 च्या क्यूरेटिंग संपादक रूशिना मनशॉ घिडियाल म्हणाल्या, ''मागील 5 वर्षांपासून गोदरेज फूड ट्रेण्ड्स रिपोर्टने वर्षानुवर्षे आपली सखोलता, उपस्थिती व दर्जा वाढवला आहे. कोरोना महामारीमुळे जागतिक आहार उद्योगामध्ये मोठा बदल घडून आला. पण ही महामारी राष्ट्रीय व जागतिक पातळीवर भारतीय पाककलांसाठी उत्साहवर्धक भविष्य म्हणून प्रोत्साहन देणारी देखील ठरली. जगभरात भारतीय पाककलांबाबत असलेल्या समजामधील बदल त्यामधील गुंतागुंत समोर आणते आहे. हेच अहवालाच्या नवीन जागतिक पुनरावलोकन विभागामध्ये दिसून आले.'' त्या पुढे म्हणाल्या, ''2022 हे वर्ष संपन्न पाककला वारसा ओळखण्याचे आणि आपल्या पाककलांबाबत अभिमान वाढवण्याचे वर्ष असेल. आमच्या निदर्शनास येत आहे की, पाककला संशोधनाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाईल आणि फूड स्टडीजवरील नवीन विभागाचा याबाबत माहिती करून घेत अहवाल तयार करण्याची इच्छा आहे. पण गोदरेज फूड ट्रेण्ड्स रिपोर्ट 2022 च्या या कलेक्टर्स एडिशनला अत्यंत खास बनवणारी बाब म्हणजे तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये दिसण्यात येणारी कलिनरी डीप-डाइव्ह्सची सिरीज. व्हिज्युअल्स व माहितीने संपन्न या सिरीजमध्ये तुम्हाला अनेक विषय पाहायला मिळतील, ज्यांच्याबाबत मागील 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली आहे. हे विषय आहेत- राइज ऑफ देसी व्हेजीटेबल्स, चिकन कंझप्शन, इंडियन कॉफी, मिठाई, ट्रेडिशनल किचनवेअर, प्लाण्ट फॉरवर्ड फूड्स आणि इंडियन फर्मेण्ट्स.''
गोदरेज फूड ट्रेण्ड्स रिपोर्ट 2022 हे 95 पानांचे सविस्तर एडिशन www.vikhrolicucina.com या वेबसाइटवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. परिमाणात्मक माहितीव्यतिरिक्त 2022 साठी अव्वल 12 अंदाज खालील इन्फोग्राफिकमध्ये आहेत.
गोदरेज इंडस्ट्रीज लि. भारतातील आघाडीचा व्यवसाय समूह गोदरेज ग्रुपचा भाग आहे. गोदरेज इंडस्ट्रीज ओलिओकेमिकल्स, सर्फेक्टण्ट्स, फायनान्स व गुंतवणूक आणि इस्टेट व्यवस्थापनाच्या व्यवसायामध्ये सामील आहे. कंपनीचे तिच्या उपकंपन्या, सहयोगी कंपन्या व संयुक्त उद्यमांच्या माध्यमातून मालमत्ता विकास, तेल पाम लागवड, पशुखाद्य व कृषी-उत्पादने, कुक्कुटपालन, पर्सनल केअर व हाऊसहोल्ड केअर इत्यादींसह विविध उद्योगांमध्ये महत्त्वाचे हितसंबंध आहेत.
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.godrejindustries.com