gokul milk price increase : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ 'गोकुळ'ने दूध विक्री दरात वाढ केली. शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी दोन रुपये वाढवून दिल्यानंतर ग्राहकांना विकायच्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय 'गोकुळ'ने घेतला. गोकुळ ब्रँडच्या २०० मिली फुल क्रिम दुधाच्या दरात तसेच प्रमाणित, गाय आणि टोण्ड दुधाच्या दरांमध्ये बदल केलेला नाही.
सध्या एक लिटर फुल क्रिम दूध ५४ रुपये दराने मिळते, हे दूध शनिवार १६ एप्रिल २०२२ पासून ५८ रुपये दराने मिळेल. तसेच ५०० मिली फुल क्रिम दूध २७ रुपये दराने मिळते, हे दूध शनिवार १६ एप्रिल २०२२ पासून २९ रुपये दराने मिळेल. नव्या दराची पॉलिफिल्म उपलब्ध होईपर्यंत जुन्या दराच्या पॉलिफिल्ममधून दूध मिळेल पण ग्राहकांना पैसे नव्या दराने द्यावे लागतील. सुधारित दर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात लागू आहेत.