Gold-Silver Rate Today, 30 August 2022: सोने आणि चांदीचा भाव घसरला, रुपयातील घसरणीबरोबरच जागतिक घटकांचा प्रभाव, पटापट पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 30 August 2022: सोन्याच्या भावातील (Gold Price) घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारातील ट्रेंडला धक्का देत भारतीय बाजारातील सोन्याच्या भावात घसरण झाली. कमजोर रुपयाचा (Weak Rupee) सोन्याच्या भावावर परिणाम होतो आहे. मात्र त्याचबरोबर डॉलरच्या मूल्यातील तेजी रोखली गेल्याचाही सोन्याच्या भावातील घसरण रोखण्यास फायदा झाला. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) चांगलीच घसरण झाली असून चांदी 55,000 रुपयांच्या खाली आली आहे.

Gold and Silver Rate Today: Gold continues to fall
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • जागतिक बाजारातील ट्रेंडला धक्का देत भारतीय बाजारातील सोन्याच्या भावात घसरण झाली.
  • चांदीच्या भावातदेखील (Silver Price) चांगलीच घसरण झाली असून चांदी 55,000 रुपयांच्या खाली आली
  • खरेदीदार मोठ्या किंमतीत घट होण्याची वाट पाहत असताना भारतातील सोन्याची मागणी थंडावली.

Gold and Silver Rate Today, 30 August 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावातील (Gold Price) घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारातील ट्रेंडला धक्का देत भारतीय बाजारातील सोन्याच्या भावात घसरण झाली. कमजोर रुपयाचा (Weak Rupee) सोन्याच्या भावावर परिणाम होतो आहे. मात्र त्याचबरोबर डॉलरच्या मूल्यातील तेजी रोखली गेल्याचाही सोन्याच्या भावातील घसरण रोखण्यास फायदा झाला. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) चांगलीच घसरण झाली असून चांदी 55,000 रुपयांच्या खाली आली आहे. सोमवारी डॉलर निर्देशांक दोन दशकांच्या उच्चांकीपासून दूर होतो. तर दहा वर्षांसाठीच्या बेंचमार्क बॉंडच्या परताव्यात दोन महिन्यांच्या उच्चांकीवरून घसरण झाली आहे. (Gold and Silver price under pressure amid global trends and weak Rupee)

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022:  गणेश चतुर्थीला बाप्पाच्या या रंगाच्या मूर्तीची करा स्थापना, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

सोन्याचा ताजा भाव

मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.20 टक्क्यांनी किंवा 100 रुपयांनी घसरून 51,150 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. चांदीचा भाव मात्र 0.62 टक्क्यांनी घसरून 341 रुपये प्रति किलो 54,899 रुपयांवर आला आहे. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 51,265 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होते. तर चांदीचा भाव 54,316 रुपये प्रति किलो होता. सोन्याच्या स्पॉट किंमती तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत प्रति 10 ग्रॅम 1,200 रुपयांनी घसरल्या आहेत. तर चांदीचा भाव एका महिन्यात 55,000 रुपये प्रति किलोच्या खाली आला आहे.

अधिक वाचा : Suicide in Maharashtra : आत्महत्येत देशात महाराष्ट्राचा क्रमांक प्रथम, तब्बल ६ टक्क्यांनी आत्महत्यांमध्ये वाढ

जागतिक परिस्थिती

जगातील सर्वात मोठी मध्यवर्ती बॅंक असलेल्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी अलीकडच्या आपल्या भाषणात दिलेला संदेश मोठा आणि स्पष्ट आहे. प्रचंड वाढलेल्या महागाईचा दबाव अजून कायम राहणार आहे कायम राहण्यासाठी येथे आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विलक्षण प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी बहुधा रोजगार कमी होणे आणि अर्थव्यवस्थांमधील मंदीला तोंड द्यावे लागेल असे जेरोम पॉवेल यांनी म्हटले होते. जागतिक बाजारातील किंमतीतील घसरणीमुळे खरेदीला प्रोत्साहन मिळाल्याने सोन्याचा सर्वोच्च ग्राहक असलेल्या चीनमधील सोन्याचे प्रीमियम गेल्या आठवड्यात ऑक्टोबरनंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोचले. तर खरेदीदार किंमतीत मोठी घट होण्याची वाट पाहत असल्यामुळे भारतातील सोन्याची मागणी थंडावली.

अधिक वाचा : रेल्वे क्रॉसिंगवर थोडक्यात बचावला, बाईकचा झाला चेंदामेंदा 

जाणकार काय म्हणतात

अॅक्सिस सिक्युरिटीजचे कमोडिटीज प्रमुख प्रीतम पटनाईक म्हणाले की, ग्रीनबॅकमध्ये नफा बुकिंगमुळे कालच्या व्यवहारात सोन्यात फारशी तेजी नव्हती. "सोन्याच्या भावात तेजी येण्याची फारशी शक्यता दिसत नाही कारण एक आक्रमक अमेरिकन फेडर रिझर्व्ह आपल्या आक्रमक दर वाढीच्या योजनांसह पुढे जाणार आहे," 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव

स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी वाढून 1,739.14 डॉलर प्रति औंस झाले. सोमवारी किंमती 1,719.56 डॉलरच्या एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या. अमेरिकन सोन्याचे फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी वाढून 1,751.7 डॉलरवर पोचले.  स्पॉट सिल्व्हर 0.1 टक्क्यांनी घसरून 18.73 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी घसरून 862.72 डॉलर आणि पॅलेडियम 0.4 टक्क्यांनी घसरून 2,155.68 डॉलरवर आले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी