Gold-Silver Rate Today, 11 August 2022: सोने झाले स्वस्त...रक्षाबंधनला बहिणीला द्या दागिन्यांची भेट...पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 11 August 2022 : गुरुवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील घसरलेल्या किंमतीचा परिणाम आज भारतीय वायदे बाजारावरही दिसून आला. आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र, तरीही सोन्याचा भाव 52 हजारांच्या वरच आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर(MCX)आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 175 रुपयांनी घसरून 52,066 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • सोने सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.33 टक्क्यांनी घसरले
  • चांदीच्या भावात 0.74 टक्क्यांची घसऱण
  • वर्षअखेरपर्यंतचा भाव पाहिला तर सोन्याचा भावही 54 हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज

Gold and Silver Rate Today, 11 August 2022 : नवी दिल्ली: गुरुवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील घसरलेल्या किंमतीचा परिणाम आज भारतीय वायदे बाजारावरही दिसून आला. आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र, तरीही सोन्याचा भाव 52 हजारांच्या वरच आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर(MCX)आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 175 रुपयांनी घसरून 52,066 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तत्पूर्वी, सोन्याचा व्यवहार 52,144 रुपयांच्या पातळीवर  सुरू झाला होता, परंतु मागणीतील घसरणीमुळे लवकरच भाव खाली आले. सोन्याचा भाव सध्या मागील बंद भावाच्या तुलनेत 0.33 टक्क्यांनी कमी आहे. (Gold and silver prices drops amid drop in demand)

अधिक वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात अन् सेनेच्या गडात भाजपची जोरदार फिल्डिंग

चांदीची चमक देखील उतरली

सोन्याच्या धर्तीवर चांदीच्या भावातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर, चांदीची फ्युचर्स किंमत 434 रुपयांनी घसरून 58,526 रुपये प्रति किलो झाली आहे. तत्पूर्वी, चांदीचा व्यवहार 58,437 रुपयांच्या पातळीवर सुरू झाला. काही काळानंतर, चांदीच्या भावात तेजी आली मात्र तरीही मागील बंद किंमतीपेक्षा 0.74 टक्क्यांनी खाली व्यवहार करते आहे.

जागतिक बाजारपेठेतील स्थिती

जागतिक बाजारपेठेतही आज सोन्या-चांदीच्या भावावर दबाव दिसून येतो आहे. अमेरिकन बाजारामध्ये आज सोन्याची स्पॉट किंमत 1,784.97 डॉलर प्रति औंस होती. ही मागील बंद किंमतीपेक्षा 0.38 टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत देखील आज घसरून 20.45 डॉलर प्रति औंस झाली. मागील बंद किंमतीपेक्षा हे 0.69 टक्के कमी आहे.

अधिक वाचा : Happy Raksha Bandhan 2022 Marathi Messages : रक्षाबंधन निमित्त Facebook, Instagram, WhatsApp, Twitter आणि Social  Media वर शेअर करा मराठी संदेश

सोन्याचा भाव कुठपर्यत पोचणार

जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीवर अमेरिकन बाजाराचा लक्षणीय परिणाम होतो. अमेरिकेमध्ये, जुलैमधील महागाईची आकडेवारी दिलासा देणारी दिसते आहे. त्यामुळे गुंतवणुकदार भविष्यात सोने खरेदी करतील अशी शक्यता आहे. कमोडिटी तज्ज्ञांच्या मते वर्षअखेरीस सोन्याचा भाव 54 हजारांच्या पुढे जाईल. पण भू-राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव 48 हजारांपर्यंत घसरेल.

अधिक वाचा : राज्यातील शौर्य पुरस्कार विजेत्यांना मानाचा मुजरा

सोने व्यापारी थोडे सावध आहेत कारण ते अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत. कारण महागाईचा सामना करण्यासाठी अमेरिकन फेडच्या धोरणात्मक बाबींसाठी हा मार्गदर्शक घटक असेल. अमेरिकेतील रोजगारासंदर्भात मागील आठवड्यात सकारात्मक ठोस अहवाल आल्यानंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve)आक्रमकपणे व्याजदर वाढीची शक्यता वाढवली आहे. त्यामुळे सोमवारी सोन्याचे भाव स्थिर झाले तर डॉलरचे मूल्य वाढले आहे आणि अमेरिकन बॉंडचा परतावा वाढला आहे. जुलैमध्ये अमेरिकेतील नोकऱ्यांच्या वाढीला अनपेक्षितपणे वेग आला. रोजगाराची पातळी त्याच्या कोरोना महामारीच्या आधीच्या पातळीपेक्षा वर आली आणि अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती कमी झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हची आक्रमक दरवाढ आणि ताळेबंदातील कपात हे अजूनही सोन्याच्या तेजीला मोठा प्रतिकार करतील. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी