Gold and Silver Rate Today, 26 July 2022: नवी दिल्ली : जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या भावात (Gold Price) वाढ झाली आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) वाढ झाली आहे. सोने आजही 51,000 च्या खाली व्यवहार करत असले तरी आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याचा भाव पुन्हा एकदा 50,500 रुपयांच्या वर पोचला आहे. सोन्याच्या ताजा भाव जाणून घेऊया. (Gold and silver prices rise but still unstable)
अधिक वाचा : Retail Inflation:: किरकोळ महागाईत भारत 12 प्रमुख देशांमध्ये अव्वल, जगभरात दर वाढवण्याची शक्यता
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्स (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सचा भाव 16 रुपयांनी वाढून 50,552 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा वायदा सकाळी 85 रुपयांनी वाढून 54,492 रुपये प्रति किलो झाला. याआधी सोन्याचा व्यवहार 50,598 रुपये, तर चांदीचा व्यवहार
54,610 प्रति किलोने सुरू झाला. मात्र यानंतर मागणी कमी झाल्याने दोन्ही धातूंचे भाव लवकरच खाली आले. सोने सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी वाढले आहे.
अधिक वाचा : ITR Filing : प्राप्तिकर विवरणपत्र भरताना मिळेल 2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट, जाणून घ्या कसे
आता जागतिक बाजारातील परिस्थिती पाहायची तर बऱ्याच काळानंतर जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,722.2 डॉलर प्रति औंस होती, तर चांदीची स्पॉट किंमत देखील 18.52 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. म्हणजेच आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
तुम्हालाही सोन्या-चांदीचा भाव जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. येथे तुम्ही ताजा भाव तपासू शकता.
चलनविषयक धोरणावर आणि पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात बैठक घेणार आहे. डॉलरच्या मूल्यात 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे इतर चलने असलेल्या खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग झाले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्या बैठकीत अमेरिकेतील व्याजदर 75 बेस पॉइंट्सने वाढण्याची अपेक्षा आहे.
वाढत्या महागाईने गुंतवणुकदारांना महागाईविरोधात बचाव करणाऱ्या मालमत्ता आणि गुंतवणूक प्रकारांकडे वळवले आहे. डॉलरची उच्चांकावरून विक्री होते आहे आणि अमेरिकेच्या आर्थिक वाढीवरील चिंतेमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. मोठ्या मध्यवर्ती बँकांकडून करण्यात आलेली आक्रमक दरवाढ आणि कडक वित्तीय उपाय सोन्याला मोठा प्रतिकार म्हणून काम करतील. औद्योगिक धातू आणि कच्च्या तेलाच्या किंमतीतील मंदीमुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या भावातील अस्थिरता अजूनही कायम आहे. आजही सोन्याच्या भावात फारसा बदल न होता ते खालच्याच पातळीवर होते. अमेरिकन ट्रेझरीचा घटलेला परतावा आणि अमेरिकन डॉलरच्या घोडदौडीला लागलेला थोडासा लगाम यामुळे सोने आणि चांदीच्या भावाला थोडासा आधार मिळाला.