Gold-Silver Rate Today, 29 July 2022: सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, चांदीदेखील वधारली...अमेरिकन घटकांचा परिणाम, पटापट पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 29 July 2022: सोन्याच्या भावात (Gold Price)शुक्रवारी वाढ झाली मात्र सलग चौथ्या मासिक घसरण सोन्याकडून नोंदवली जाणार आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) वाढ झाली आहे. अमेरिकेतील बॉंडच्या वाढत्या परताव्यामुळे सोन्याच्या भावावर दबाव आला आहे. अर्थात मे महिन्यापासून सोन्याच्या भावात वाढ दिसून येते आहे.

Gold and Silver Rate Today: Gold Price rises
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात वाढ 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात पुन्हा वाढ
  • चांदीच्या भावातदेखील आली तेजी
  • जागतिक घटकांच्या पार्श्वभूमीवर सोन्याकडे वाढला कल

Gold and Silver Rate Today, 29 July 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold Price)शुक्रवारी वाढ झाली मात्र सलग चौथ्या मासिक घसरण सोन्याकडून नोंदवली जाणार आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) वाढ झाली आहे. अमेरिकेतील बॉंडच्या वाढत्या परताव्यामुळे सोन्याच्या भावावर दबाव आला आहे. अर्थात मे महिन्यापासून सोन्याच्या भावात वाढ दिसून येते आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत अनपेक्षितपणे आकुंचन पावली. त्याचा परिणाम होत आर्थिक मंदीचे धोके वाढले, परिणामी सुरक्षित मालमत्ता आणि गुंतवणूक प्रकार म्हणून असलेले सोन्याचे महत्त्व वाढले आहे. जाणून घ्या सोन्याचा ताजा भाव. (Gold and silver prices surged but still under pressure)

अधिक वाचा : दोन गटात तुफान हाणामारी, पहा व्हिडीओ

सोन्याचा ताजा भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.12 टक्‍क्‍यांनी किंवा 62 रुपयांनी वाढून 51,505 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत होते. तर चांदीचा भाव 0.59 टक्क्यांहून अधिक किंवा 341 रुपयांनी वाढून 57,960 रुपये प्रति किलोवर पोचला. नोव्हेंबर 2020 पासूनचा सोने-चांदीचा मासिक तोटा कमी होण्याची शक्यता नाही. जुलैचा बहुतांश काळ डॉलर 20 वर्षांच्या उच्चांकीवर होता. ज्यामुळे इतर चलन धारकांमध्ये सोन्याची मागणी वाढली आहे.

अधिक वाचा : Facebook : फेसबुकमुळे वैतागले अख्खं गाव, ४० ते ५० महिलांनी दिली पोलिसात तक्रार

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी शिखर बँक येत्या काही महिन्यांत व्याजदर वाढीची गती कमी करू शकते, असे संकेत दिल्यानंतर सोन्याचे भाव वाढले आहेत, असे ICICIDirect ने आपल्या अहवालात म्हटले आहे. "अमेरिकेच्या निराशाजनक मॅक्रो इकॉनॉमिक आकडेवारीमुळे सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंची मागणी वाढली," असे त्यात म्हटले आहे. "अमेरिकेची अर्थव्यवस्था अनपेक्षितपणे दुस-या तिमाहीत घसरली आहे. ग्राहक खर्च दोन वर्षांत सर्वात कमी वेगाने वाढला आहे."

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 51,222 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावाने विकले गेले. तर चांदीचा भाव 55,972 रुपये प्रति किलो होता. सोन्याच्या स्पॉट किमतींनी गेल्या एका आठवड्यात 1,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झेप घेतली आहे. तर याच कालावधीत चांदीचा भाव 2,100 रुपये प्रति किलोवर पोचला आहे.

अधिक वाचा : Shocking Incident : कामठी, नागपूर येथे अंत्यसंस्कार करताना डिझेलला आग, 2 ठार, 1 जखमी

जाणकार काय म्हणतात

वाढत्या महागाईमुळे आणि मंदीच्या भीतीमुळे सुरक्षित मालमत्ता आणि गुंतवणूक प्रकार म्हणून सोने आकर्षक बनले आहे, असे शेअरइंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख रवी सिंग यांनी सांगितले. "जोपर्यंत दोन घटक बाजारावर वर्चस्व गाजवत राहतील तोपर्यत सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची परिस्थिती कायम आहे. प्रत्येक घसरणीनंतर एक चांगली संधी आहे," असे ते पुढे म्हणाले.

जागतिक बाजारपेठीतील स्थिती

स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून 1,758.94 डॉलर प्रति औंस झाले. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी वाढून 1,775.10 डॉलरवर पोचले. मेच्या मध्यापासून धातू 1.9 टक्क्यांनी वाढला आहे.स्पॉट सिल्व्हर 0.3 टक्क्यांनी घसरून 20.04 डॉलर प्रति औंस झाला, तर प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी घसरून 886.24 डॉलरवर आला. दोघांनाही मासिक तोटा सहन करावा लागतो. पॅलेडियम 0.8 टक्क्यांनी वाढून 2,095.13 डॉलरवर आला आहे आणि या महिन्यात सुमारे 8.2 टक्क्यांनी वाढला आहे, ही जानेवारीपासूनची सर्वोत्तम पातळी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी