सोने चांदी भाव, १० ऑगस्ट २०२०:  सोन्याच्या वायदा भावात उसळी, चांदीत जबरदस्त तेजी, फटाफट चेक करा आजचा भाव

सोने चांदी भाव, १० ऑगस्ट २०२०:  नवी दिल्ली :  स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price) चांदी वाढ झाली.

Gold and Silver Rate 10 august 2020
सोने चांदी भाव, १० ऑगस्ट २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price) चांदी वाढ झाली.
  • चांदीबाबत बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात सोमवारी सकाळी त्यांच्या किंमतीत जबरदस्त उसळी मारल्याचे दिसले.
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात वाढ दिसून आली.  

सोने चांदी भाव, १० ऑगस्ट २०२०:  नवी दिल्ली :  स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price) चांदी वाढ झाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांनी पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भाव ०.४२ टक्क्यांनी म्हणजे २३१ रुपयांनी वाढून प्रती १० ग्रॅम ५५ हजार २० रुपयांवर ट्रेंड करत होता. जागतिक स्तरावर पण सोमवारी सकाळी सोन्याच्या भावात तेजी दिसून आली. 
 
 दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात सोमवारी सकाळी त्यांच्या किंमतीत जबरदस्त उसळी मारल्याचे दिसले. एमसीएक्सवर चार सप्टेंबर  २०२० च्या चांदीचा भाव सोमवारी सकाळी ९ वाजून ५१ मिनिटांनी १.२९ टक्के म्हणजे ९६० रुपयांच्या जबरदस्त तेजीसह ७५ हजार १२० रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. या शिवाय चार डिसेंबर २०२० च्या चांदीचा वायदा भाव या वेळी ०.८५ टक्के वाढीसह म्हणजे ६४७ रुपयांची वाढ होऊन ७६ हजार ९०२ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत आहे.  

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी सकाळी  वायदा भावात वाढ आणि हाजिर भावात घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या ११.६० डॉलर म्हणजे ०.५७ टक्के तेजीसह २०३९.७५ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.२९ टक्के म्हणजे ५.९० डॉलरच्या घटीसह २०२९.६५ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी सकाळी  वायदा भावात वाढ आणि हाजिर भावात घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.६० डॉलर म्हणजे २.१८ टक्के तेजीसह २८.१४ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव १.०१ टक्के म्हणजे ०.२८ डॉलरच्या घटीसह २८.०२ डॉलर प्रति औंसच्या  पातळीवर ट्रेंड करत होता. 

मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात झाली वाढ 

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात वाढ दिसून आली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम  ११० रुपयांनी महागले . प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५५ हजारवर ३७० सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५४ हजारवर ३७० सुरू आहे. सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. चांदीत ९४० रुपयांची  वाढ  झाली.  काल ७४ हजार २१० वर असलेली चांदी आज  ७५ हजार १५० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर  ५५ हजारवर २६० वर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर  ५४ हजारवर २६० वर बंद झाला होता.

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५५ हजार ३७०  ५५ हजार २६०
पुणे  ५५ हजार ३७० ५५ हजार २६०
जळगाव  ५५ हजार ३७० ५५ हजार २६०
कोल्हापूर ५५ हजार ३७० ५५ हजार २६०
लातूर ५५ हजार ३७० ५५ हजार २६०
सांगली ५५ हजार ३७० ५५ हजार २६०
बारामती  ५५ हजार ३७० ५५ हजार २६०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५४ हजार ३७०  ५४ हजार २६०
पुणे  ५४ हजार ३७० ५४ हजार २६०
जळगाव  ५४ हजार ३७० ५४ हजार २६०
कोल्हापूर ५४ हजार ३७० ५४ हजार २६०
लातूर ५४ हजार ३७० ५४ हजार २६०
सांगली ५४ हजार ३७० ५४ हजार २६०
बारामती  ५४ हजार ३७० ५४ हजार २६०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ७५ हजार १५० ७४ हजार २१०
पुणे  ७५ हजार १५० ७४ हजार २१०
जळगाव  ७५ हजार १५० ७४ हजार २१०
कोल्हापूर ७५ हजार १५० ७४ हजार २१०
लातूर ७५ हजार १५० ७४ हजार २१०
सांगली ७५ हजार १५० ७४ हजार २१०
बारामती  ७५ हजार १५० ७४ हजार २१०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी