सोने चांदी भाव, १० सप्टेंबर २०२०: सोन्याच्या भावात घट, चांदीत चमकली फटाफट चेक करा १० सप्टेंबरचा भाव

 Gold and Silver Rate| सोने चांदी आजचा भाव, १० सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी व्यापारी सत्रात गुरूवारी सोने स्वस्त झाले तर चांदीची किंमती वाढल्या.

Gold and Silver Rate 10 September 2020
सोने चांदी भाव, १० सप्टेंबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी व्यापारी सत्रात गुरूवारी सोने स्वस्त झाले तर चांदीची किंमती वाढल्या.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ झाली.

Gold Price Today, सोने चांदी आजचा भाव, १० सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी व्यापारी सत्रात गुरूवारी सोने स्वस्त झाले तर चांदीची किंमती वाढल्या.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  ११ वाजून ४५ मिनिटांनी  पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.२४ टक्के म्हणजे १२२ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५१ हजार २८० रुपयांवर ट्रेंड करत होता. या सोबत ०.२१ टक्के म्हणजे १०७ रुपयांची घट दिसून आली, ५१ हजार ५०६ रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे.  

 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी चांदीच्या वायदा किंमतीत वाढ दिसली आहे.  एमसीएक्सवर चार सप्टेंबर  २०२० च्या चांदीचा भाव  बुधवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी ०.६२ टक्के म्हणजे ४२६ रुपयांच्या वाढीसह ६८ हजार ८६९ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. गेल्या सत्रात डिसेंबरच्या कराराची चांदीची किंमत ६८ हजार ४४३ रुपये प्रति किलोग्रॅम होती. या शिवाय मार्च २०२१ आणि डिलेव्हरीची चांदीची किंमत ६८६ रुपये म्हणजे ०.९७ टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यामुळे चांदीचा दर  ७१, १५२ रुपये प्रति किलोग्रॅम सुरू होता. यापूर्वी बुधवारी मार्च २०२१ च्या डिलेव्हरीच्या चांदीच्या किंमत ७१ हजार १५२ रुपयांवर ट्रेंड करत होती.  

 
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या २.०० डॉलर म्हणजे ०.१० टक्के वाढीसह १९५६.९० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.८० टक्के म्हणजे ०.०४ डॉलरच्या वाढीसह १९४७.६४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी सकाळी  चांदीत वाढ पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.२१ डॉलर म्हणजे २७.३० टक्के वाढीसह २६.८३ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.६० टक्के म्हणजे ०.६० डॉलरच्या वाढीसह २७.१४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
 

महाराष्ट्रात सोन्यात किरकोळ वाढ, चांदी चमकली

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ झाली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम १०  रुपयांनी स्वस्त झाले.  प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ५१० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ५१०  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ५०० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ५०० रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात  सुरूवातीला भरघोस वाढ  दिसून आली. चांदीत ६०० रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल  ६७ हजार ९०० वर असलेली चांदी आज  ६८ हजार ५०० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

 

 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ५१० ५० हजार ५००
पुणे  ५० हजार ५१० ५० हजार ५००
जळगाव  ५० हजार ५१० ५० हजार ५००
कोल्हापूर ५० हजार ५१० ५० हजार ५००
लातूर ५० हजार ५१० ५० हजार ५००
सांगली ५० हजार ५१० ५० हजार ५००
बारामती  ५० हजार ५१० ५० हजार ५००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ५१० ४९ हजार ५००
पुणे  ४९ हजार ५१० ४९ हजार ५००
जळगाव  ४९ हजार ५१० ४९ हजार ५००
कोल्हापूर ४९ हजार ५१० ४९ हजार ५००
लातूर ४९ हजार ५१० ४९ हजार ५००
सांगली ४९ हजार ५१० ४९ हजार ५००
बारामती  ४९ हजार ५१० ४९ हजार ५००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६८ हजार ५०० ६७ हजार ९००
पुणे  ६८ हजार ५०० ६७ हजार ९००
जळगाव  ६८ हजार ५०० ६७ हजार ९००
कोल्हापूर ६८ हजार ५०० ६७ हजार ९००
लातूर ६८ हजार ५०० ६७ हजार ९००
सांगली ६८ हजार ५०० ६७ हजार ९००
बारामती  ६८ हजार ५०० ६७ हजार ९००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी