सोने चांदी भाव, 11 जानेवारी 2021:  सोन्याच्या वायदा भावात तेजी, चांदी महाग, फटाफट चेक करा काय आहे भाव

Gold and Silver Rate | स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात  तेजी पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)तेजी पाहायला मिळाली.

gold and silver rate 11 January 2021
सोने चांदी आजचा भाव, 11 जानेवारी 2021  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात  तेजी पाहायला मिळाली.  
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा  भावात तेजी पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.  

Gold Price , सोने चांदी भाव, 11 जानेवारी 2021:  नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात  तेजी पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)तेजी पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  11:23  वाजता 5 फेब्रुवारी 2021 च्या सोन्याचा वायदा भावात 0.24 टक्के म्हणजे  117 रुपयांची तेजी होऊन प्रती 10 ग्रॅम 49,084 रुपयांवर ट्रेंड करत होता.  गेल्या सत्रात सोन्याचा दर  49,967 प्रति10 ग्रॅमवर बंद झाला होता.  या शिवाय पाच एप्रिल २०२१ च्या सोन्याचा वायदा भावात 0.18 टक्के म्हणजे 88 रुपये तेजीसह 49,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करताना दिसत आहे. गेल्या सत्रात सोन्याचा दर  49,012 प्रति10 ग्रॅमवर बंद झाला होता.   

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी चांदीच्या दरात तेजी दिसली आहे.  एमसीएक्सवर सकाळी 10:30 वाजता मार्च 2021 च्या चांदीचा भाव 171  रुपयांच्या म्हणजे 0.27 टक्के तेजीसह 64,402  रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. गेल्या सत्रात चांदीची किंमत 64,231  रुपये प्रति  किलोवर बंद झाली होती. दुसरीकडे मे 2021 च्या कराराची चांदीची किंमत 315  रुपये म्हणजे ०.48 टक्के तेजीसह 65,517  रुपये प्रति किलो ट्रेंड करत होते. गेल्या सत्रात मे महिन्याच्या कराराची चांदी 65,202 रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाली होती. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा  भावात तेजी पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 10.80 डॉलर म्हणजे 0.59  टक्के तेजीसह 1,846.20 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.02 टक्के म्हणजे 0.32 डॉलरच्या तेजीसह 1,849.33  डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी मार्च, 2021 वायदा भाव 0.30 डॉलर म्हणजे 1.21  टक्के वाढीसह 24.94 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 1.83 टक्के म्हणजे 0.47  डॉलरच्या वाढीसह 24.96  डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी