सोने चांदी भाव, ११ सप्टेंबर २०२०:  सोन्या-चांदीत मोठी घट फटाफट चेक करा ११ सप्टेंबरचा भाव 

 Gold and Silver Rate| वायदा बाजारात आठवड्याच्या पाचव्या दिवशी व्यापारी सत्रात शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.

Gold and Silver Rate 11 September 2020
सोने चांदी भाव, ११ सप्टेंबर २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वायदा बाजारात आठवड्याच्या पाचव्या दिवशी व्यापारी सत्रात शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी वायदा भावात घट पाहायला मिळाली.
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ घट झाली.

Gold Price , सोने चांदी भाव, ११ सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या पाचव्या दिवशी व्यापारी सत्रात शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  १० वाजता पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.८६ टक्के म्हणजे ४४७ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५१ हजार ३२७ रुपयांवर ट्रेंड करत होता. या सोबत डिसेंबरच्या वायदा सोन्याचा भाव ०.८७ टक्के म्हणजे ४५२ रुपयांची घट दिसून आली, ५१ हजार ५१० रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे.  सोन्याच्या वैश्विक किंमतीमध्ये शुक्रवार सकाळी मोठ्या प्रमाणात घट दिसली. 

 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी चांदीच्या वायदा किंमतीत जबरदस्त घट दिसली आहे.  एमसीएक्सवर चार सप्टेंबर  २०२० च्या चांदीचा भाव  शुक्रवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी १.५८ टक्के म्हणजे १०९१ रुपयांच्या घटीसह ६७ हजार ९०० रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. चांदीच्या वैश्विक किंमतीमध्ये शुक्रवार सकाळी मोठ्या प्रमाणात घट दिसली. 

 
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी वायदा भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या १७.२० डॉलर म्हणजे ०.८८ टक्के घटीसह १९४७.१० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.२८ टक्के म्हणजे ५.३९ डॉलरच्या वाढीसह १९४०.७० डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी सकाळी  चांदीत घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.४७ डॉलर म्हणजे १.७१ टक्के घटीसह २६.८३ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.६९ टक्के म्हणजे ०.१९ डॉलरच्या घटीसह २७.६९ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
 

महाराष्ट्रात सोने चांदी झाले स्वस्त 

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ घट झाली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ४०  रुपयांनी स्वस्त झाले.  प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ४५० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ४५०  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ४९० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ४९० रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात  सुरूवातीला जबरदस्त घट  दिसून आली. चांदीत ५८० रुपये प्रति किलोची घट झाली.  काल  ६८ हजार ५६० वर असलेली चांदी आज  ६७ हजार ९८० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी