सोने चांदी भाव, 13 जानेवारी 2021:  सोन्याच्या वायदा भावात तेजी, चांदी महाग, फटाफट चेक करा भाव

Gold and Silver Rate | स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोनेच्या भावात  तेजी पाहायला मिळाली.  

gold and silver rate 13 January 2021
सोने चांदी भाव, 13 जानेवारी 2021  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोनेच्या भावात  तेजी पाहायला मिळाली.  
  • स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी चांदीच्या दरात तेजी दिसली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी वायदा  भावात तेजी पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, 13 जानेवारी 2021:  नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोनेच्या भावात  तेजी पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price) तेजी पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  11:23  वाजता 5 फेब्रुवारी 2021 च्या सोन्याचा वायदा भावात 0.65 टक्के म्हणजे  317 रुपयांची तेजी होऊन प्रती 10 ग्रॅम 49,362 रुपयांवर ट्रेंड करत होता.  या शिवाय पाच एप्रिल २०२१ च्या सोन्याचा वायदा भावात 0.65 टक्के म्हणजे 319 रुपये तेजीसह 49,353 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करताना दिसत आहे. बुधवारी जागतिक बाजारात सकाळी सोन्याच्या हाजीर आणि वायदा किंमतीत वाढ दिसून आली. 

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी चांदीच्या दरात तेजी दिसली आहे.  एमसीएक्सवर सकाळी 10:30 वाजता मार्च 2021 च्या चांदीचा भाव 140  रुपयांच्या म्हणजे 0.21 टक्के तेजीसह 66,046  रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. बुधवारी जागतिक बाजारात सकाळी चांदीच्या हाजीर भावात तेजी आणि वायदा किंमतीत घट दिसून आली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी वायदा  भावात तेजी पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 15.30 डॉलर म्हणजे 0.83  टक्के तेजीसह 1,859.50 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.26 टक्के म्हणजे 4.90 डॉलरच्या तेजीसह1,859.67   डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  तिसऱ्या दिवशी बुधवारी वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी मार्च, 2021 वायदा भाव 0.20  डॉलर म्हणजे 0.79  टक्के वाढीसह 25.64 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 0.05 टक्के म्हणजे 0.01  डॉलरच्या घटीसह 25.55  डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी