सोने चांदी भाव, 14 मे  2021:  अक्षय तृतीयाला स्वस्त झाले सोने, चांदीही घसरली, पटापट चेक करा 14 मेचा भाव

Gold and Silver Rate |  सोन्याच्या वायदा भावात शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली. स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.  

gold and silver rate 14 may 2021 mumbai pune jalgaon kolhapur latur nashik sangli baramati
सोने चांदी भाव, 14 मे  2021:  अक्षय तृतीयाला स्वस्त झाले सोने, 

थोडं पण कामाचं

  • सोन्याच्या वायदा भावात शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली.
  • स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.  
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सकाळी वायदा  भावात तेजी  पाहायला मिळाली.  

Gold Price , सोने चांदी भाव, 14 मे 2021 :  नवी दिल्ली :  सोन्याच्या वायदा भावात शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सकाळी 10:15  वाजता  चार जून 2021 मध्ये डिलिव्हरी सोन्याचे भाव (Gold Price) 68 रुपये म्हणजे 0.14 टक्के घटीसह 47,370 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
 ऑगस्ट कराराची सोन्याची किंमत  94 रुपये किंवा 0.20 टक्क्यांनी घसरून  48,851 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या सत्रात ऑगस्ट कॉन्ट्रॅक्टच्या सोन्याचा रेट 48,945 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 

वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market) 

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.   मल्टी कमोडिटी एक्सचेंजला सकाळी 10:20  वाजता 5 जुलै 2021 रोजीच्या डिलिव्हरी चांदीची किंमत 103 रुपये म्हणजे  0.15 टक्क्यांनी घसरून 70,370 रुपये प्रती किलो झाली.  सत्रात जुलैमध्ये डिलेव्हरीच्या चांदीचा भाव  70,473 रुपये प्रति किलो होता. सप्टेंबर 2021 मध्ये चांदीची किंमत 0.12 टक्के म्हणजे 87 रुपयांच्या घटीसह 71,515  रुपये प्रतिकिलो होती, . याआधी  गेल्या सत्रात सप्टेंबरमध्ये चांदीचा दर 71,602  रुपये होता.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सकाळी वायदा  भावात तेजी  पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 0.10  डॉलर म्हणजे  0.01 टक्क्यांच्या तेजीसह 1,824.10  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव (Gold Price) 0.20 टक्के म्हणजे  3.65 डॉलरच्या घटीसह 1,823.07 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  अखेरच्या दिवशी शुक्रवारी  वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.   चांदीची किंमत 0.02 डॉलर म्हणजे 0.06  टक्क्यांनी तेजीसह 27.08  डॉलर प्रति औंसवर स्थिरावली.  चांदीचा हाजीर भाव 0.14  डॉलर म्हणजे 0.53 टक्के घटीसह 26.95  डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी