सोने चांदी आजचा भाव, १४ सप्टेंबर २०२०:  सोन्या-चांदीत घट फटाफट चेक करा १४ सप्टेंबरचा भाव 

 Today Gold and Silver Rate| वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यापारी सत्रात सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.

Gold and Silver Rate 14 September 2020
सोने चांदी आजचा भाव, १४ सप्टेंबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यापारी सत्रात सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.
  •  सोन्याचा वैश्विक भाव सोमवारी वाढीसह १९४५.५ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात वाढ  झाली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ४५०  रुपयांनी महागले झाले.

Gold Price Today, सोने चांदी आजचा भाव, १४ सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यापारी सत्रात सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर २४ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५२ हजार ४६५ रुपयांवर ट्रेंड करत होता.रुपयांच्या मुल्यात वाढ झाल्याने सोमवारी सोन्याच्या किमतीत घट दिसून आली. गेल्या सत्रात सोन्याचा भाव ५२ हजार ४८९ रुपये प्रति १० ग्रॅमला होता. 

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading)  स्थानिक बाजारात सोमवारी चांदीच्या किंमती वाढ दिसून आली. चांदी सोमवारी २२२ रुपये प्रति किलो ग्रॅमची वाढ दिसून आली. यामुळे चांदीचा भाव ६९ हजार ५९० रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात चांदीचा दर ६९ हजार ३६८ रुपये प्रति किलो ग्रॅम होता. 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरीष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा हाजीर भाव सोमवारी २४ रुपयांनी कमी झाला. 

भारती रुपया सोमवारी घरगुती शेअर बाजारात स्थिरतेनंतर एक डॉलरच्या तुलनेत पाच पैशांची मजबुती दिसली. 
 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले  सोन्याचा वैश्विक भाव सोमवारी वाढीसह १९४५.५ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. तर चांदीचा भाव सोमवारी २६.८७ डॉलर प्रति औंसवर स्थिर ट्रेंड करत होता. 

महाराष्ट्रात सोने चांदी महागले 

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात वाढ  झाली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ४५०  रुपयांनी महागले झाले.  प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ९०० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ९००  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ४५० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ४५० रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात  सुरूवातीला वाढ  दिसून आली. चांदीत ४०० रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल  ६७ हजार ९०० वर असलेली चांदी आज  ६८ हजार ३०० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी