सोने चांदी भाव, १५ सप्टेंबर २०२०: सोने-चांदीत तेजी, फटाफट चेक करा १५ सप्टेंबरचा भाव 

 Gold and Silver Rate| वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली.  

Gold and Silver Rate 15 September 2020
सोने चांदी भाव, १५ सप्टेंबर २०२०  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली.  
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात चांगली वाढ झाली.

Gold Price , सोने चांदी भाव, १५ सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  १० वाजून १५ मिनिटांनी  पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.३८ टक्के म्हणजे १९७ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५१ हजार ८८४ रुपयांवर ट्रेंड करत होता. या सोबत डिसेंबरच्या वायदा सोन्याची किंमती एमसीएक्सवर ०.३० टक्के म्हणजे १५८ रुपयांच्या वाढी सह ५२ हजार ०१७ रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे.  

 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी चांदीच्या वायदा किंमतीत वाढ दिसली आहे.  एमसीएक्सवर डिसेंबर  २०२० च्या चांदीचा भाव  बुधवारी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी ०.५९ टक्के म्हणजे ४०५ रुपयांच्या वाढीसह ६९ हजार ३७० रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. 

 
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या ११.३० डॉलर म्हणजे ०.५८ टक्के वाढीसह १९७५.६० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.४६ टक्के म्हणजे ८.९९ डॉलरच्या वाढीसह १९६५.८५ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी सकाळी  चांदीत वाढ पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या १.१७ डॉलर म्हणजे ०.३२ टक्के वाढीसह २७.६८ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव १.१३ टक्के म्हणजे ०.३१ डॉलरच्या वाढीसह २७.४३ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
 

महाराष्ट्रात सोन्या-चांदीत वाढ

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात चांगली वाढ झाली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ५५०  रुपयांनी स्वस्त झाले.  प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५१ हजार ४५० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ४५०  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ९०० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ९०० रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात  सुरूवातीला भरघोस वाढ  दिसून आली. चांदीत १२०० रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल  ६८ हजार ३०० वर असलेली चांदी आज  ६९ हजार ५०० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५१ हजार ४५० ५० हजार ५००
पुणे  ५१ हजार ४५० ५० हजार ५००
जळगाव  ५१ हजार ४५० ५० हजार ५००
कोल्हापूर ५१ हजार ४५० ५० हजार ५००
लातूर ५१ हजार ४५० ५० हजार ५००
सांगली ५१ हजार ४५० ५० हजार ५००
बारामती  ५१ हजार ४५० ५० हजार ५००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ४५० ४९ हजार ९००
पुणे  ५० हजार ४५० ४९ हजार ९००
जळगाव  ५० हजार ४५० ४९ हजार ९००
कोल्हापूर ५० हजार ४५० ४९ हजार ९००
लातूर ५० हजार ४५० ४९ हजार ९००
सांगली ५० हजार ४५० ४९ हजार ९००
बारामती  ५० हजार ४५० ४९ हजार ९००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६९ हजार ५०० ६८ हजार ३००
पुणे  ६९ हजार ५०० ६८ हजार ३००
जळगाव  ६९ हजार ५०० ६८ हजार ३००
कोल्हापूर ६९ हजार ५०० ६८ हजार ३००
लातूर ६९ हजार ५०० ६८ हजार ३००
सांगली ६९ हजार ५०० ६८ हजार ३००
बारामती  ६९ हजार ५०० ६८ हजार ३००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी