सोने चांदी भाव, १६ सप्टेंबर २०२०: सोने-चांदीत तेजी, फटाफट चेक करा १६ सप्टेंबरचा भाव 

 Gold and Silver Rate| स्थानिक  वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली.

Gold and Silver Rate 16 September 2020
सोने चांदी आजचा भाव, १६ सप्टेंबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक  वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.
  • महाराष्ट्रात सोन्यात किरकोळ वाढ, चांदी घसरली

Gold Price , सोने चांदी भाव, १६ सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : स्थानिक  वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  ११ वाजून ३० मिनिटांनी  पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.२८ टक्के म्हणजे १४४ रुपयांची वाढ होऊन प्रती १० ग्रॅम ५१ हजार ९१३ रुपयांवर ट्रेंड करत होता. या सोबत डिसेंबरच्या वायदा सोन्याची किंमती एमसीएक्सवर ०.३३ टक्के म्हणजे १७३ रुपयांच्या वाढीसह ५२ हजार ०९० रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे.  

 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी चांदीच्या वायदा किंमतीत वाढ दिसली आहे.  एमसीएक्सवर डिसेंबर  २०२० च्या चांदीचा भाव  बुधवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी ०.१२ टक्के म्हणजे ८५ रुपयांच्या वाढीसह ६९ हजार ०५२ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. जागतिक स्तरावर चांदीच्या हाजीर भावात वाढ पाहायला मिळाली. 

 
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या १.२० डॉलर म्हणजे ०.०६ टक्के वाढीसह १९६७.४० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.३० टक्के म्हणजे ५.८८ डॉलरच्या वाढीसह १९६०.०३ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सकाळी  चांदीत घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.०४ डॉलर म्हणजे ०.१४ टक्के वाढीसह २७.४३ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.१२ टक्के म्हणजे ०.०३ डॉलरच्या वाढीसह २७.१७ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
 

महाराष्ट्रात सोन्यात किरकोळ वाढ, चांदी घसरली

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ झाली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम १०  रुपयांनी महागले.  प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५१ हजार ४६० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ४६०  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५१ हजार ४५० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ४५० रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याचे दर जरी किरकोळ वाढवले तरी चांदीच्या दरात घसरण दिसून आली. चांदीत ५०० रुपये प्रति किलोची घट झाली.  काल   ६९ हजार ५००  वर असलेली चांदी आज  ६९ हजार ००० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी