सोने चांदी भाव, 17 नोव्हेंबर 2020 : खाली पडला  सोन्याचा दर, चांदी़तही घसरण, चेक करा 17 नोव्हेंबरचा भाव

Gold and Silver Rate | स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.

gold and silver rate 17 November 2020
सोने चांदी भाव, 17 नोव्हेंबर 2020 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.
  •  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, १७ नोव्हेंबर 2020:  नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी 10 वाजून 12 मिनिटांनी डिसेंबर 2020 च्या सोन्याचा वायदा भावात 70 रुपयांची घट होऊन प्रती 10 ग्रॅम 50,760  रुपयांवर ट्रेंड करत होता.   तर दुसरीकडे फेब्रुवारी 2021 च्या कराराचे सोने 75 रुपये घट होऊन 50,831 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड करत होते. 

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्यांच्या किंमतीत घट दिसली आहे.  एमसीएक्सवर डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सकाळी   0.19 टक्के म्हणजे 121 रुपयांच्या घटीसह  63,570  रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.   या शिवाय मार्च, 2021 च्या चांदीचा वायदा भाव 0.17 टक्के म्हणजे 109 रुपयांच्या घटीसह  65,380 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या 1.60 डॉलर म्हणजे  0.08 टक्के घटीसह 1,886.20  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.06 टक्के म्हणजे  1.21 डॉलरच्या घटीसह 1,887.74 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  दुसऱ्या दिवशी मंगळवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी वायदा भाव 0.01 टक्के घटीसह 24.80   डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 0.20 टक्के म्हणजे 0.05 डॉलरच्या घटीसह 24.72 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी