सोने चांदी भाव, 18 नोव्हेंबर 2020 : सोन्याच्या वायदा दरात घट, चांदी़ही स्वस्त, चेक करा 18 नोव्हेंबरचा भाव

Gold and Silver Rate | स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.

gold and silver rate 18 November 2020 mumba
सोने चांदी भाव, 18 नोव्हेंबर 2020 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  तिसऱ्या दिवशी बुधवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, १८ नोव्हेंबर २०२०:  नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी 10 वाजून 44  मिनिटांनी डिसेंबर 2020 च्या सोन्याचा वायदा भावात 0.34 टक्के 175 रुपयांची घट होऊन प्रती 10 ग्रॅम 50,591 रुपयांवर ट्रेंड करत होता.  गेल्या सत्रात डिसेंबरच्या सोन्याची किंमत 50,766  प्रती 10 ग्रॅम वर बंद झाली होती.  तर दुसरीकडे फेब्रुवारी 2021 च्या कराराचे सोने 204 रुपये म्हणजे 0.40 टक्के घटीसह 50,620 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड करत होते. गेल्या सत्रात फेब्रुवारीच्या सोन्याची किंमत 50,824  प्रती 10 ग्रॅम वर बंद झाली होती.    

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारीत्यांच्या किंमतीत घट दिसली आहे.  एमसीएक्सवर सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सकाळी 0.47 टक्के म्हणजे 297 रुपयांच्या घटीसह  62,951 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. मंगळवारी डिसेंबरच्या कराराची चांदीची किंमत  63,248 रुपये प्रति किलो ग्रॅम बंद झाली होती.   दुसरीकडे फेब्रुवारी 2021 च्या कराराची चांदी  289 रुपये म्हणजे 0.44 टक्के घटीसह 64,804 रुपये प्रति किलोग्रॅम ट्रेंड करत होती. गेल्या सत्रात मार्चच्या डिलेव्हरीची चांदीची किंमत 65,093   प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.    

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या 6.10  डॉलर म्हणजे 0.32 टक्के घटीसह 1,879  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.02 टक्के म्हणजे 0.42 डॉलरच्या घटीसह 1,880.80 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  तिसऱ्या दिवशी बुधवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी वायदा भाव गेल्या सत्राच्या 0.13 डॉलर म्हणजे 0.51 टक्के घटीसह 24.53  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 0.32  टक्के म्हणजे  0.08  डॉलरच्या घटीसह 24.41 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी