सोने चांदी भाव, 19 एप्रिल  2021:  वायदा सोने महाग, चांदीची किंमत कमी, पटापट चेक करा 19 एप्रिलचा भाव

Gold and Silver Rate | सोन्याच्या वायदा भावात सोमवारी वाढ पाहायला मिळाली. चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  चांदीच्

gold and silver rate 19 April 2021
सोने चांदी भाव, 19 एप्रिल  2021  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सोन्याच्या वायदा भावात सोमवारी वाढ पाहायला मिळाली.
  • चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  सकाळी वायदा  भावात तेजी  पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, 19 एप्रिल 2021:  नवी दिल्ली :  सोन्याच्या वायदा भावात सोमवारी वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सकाळी  11 वाजून 24 मिनिटांनी  जून 2021 मध्ये डिलिव्हरी सोन्याचे भाव (Gold Price)
187 रुपये म्हणजेच 0.39 टक्क्यांनी वाढीसह 47,540  रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मागील सत्रात जून 2021 मधील वितरण सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 47,353 रुपये होती. ऑगस्ट 2021 मध्ये डिलिव्हरी सोन्याचे दर  235 रुपयांनी म्हणजे 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 47,826 रुपये प्रती 10 ग्रॅम होते. मागील सत्रात ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 47,591 रुपये होता. 

वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)   

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.  मे 2021 रोजी सकाळी 11:27 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजला डिलिव्हरी चांदीची किंमत 218 रुपये किंवा  0.32  टक्क्यांनी घटून 68,466 रुपये प्रती किलो झाली.   गेल्या सत्रात मेच्या कराराची चांदीची किंमत 68,684 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.   त्याचप्रमाणे जुलै 2021 मध्ये डिलीव्हरी चांदी 250 रुपये किंवा 0.36 टक्क्यांनी घसरून 68,538  रुपये प्रति किलो झाली.  गेल्या सत्रात जुलैच्या कराराची चांदी 69,788 रुपये प्रति किलोवर बंद झाली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  सकाळी वायदा  भावात तेजी  पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव  0.60 डॉलर म्हणजे  0.03  टक्क्यांच्या घटीसह 1,780.80 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव (Gold Price) 0.21 टक्के म्हणजे 3.79डॉलरच्या घटीसह 1,780.30 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  पहिल्या दिवशी सोमवारी   वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   चांदीची किंमत 0.19  डॉलर म्हणजे 0.75  टक्क्यांनी घटीसह 25.91  डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. हाजीर बाजारात चांदीची किंमत  0.05 डॉलर म्हणजे 0.20 टक्के घटीसह 25.91  डॉलर प्रति औंस सुरू होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी