सोने चांदी भाव, 19 फेब्रुवारी 2021:  सोन्यात घट,  चांदीही घसरली, फटाफट चेक करा 19 फेब्रुवारीचा भाव

Gold and Silver Rate | स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारीसोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.

gold and silver rate 19 february 2021
सोने चांदी भाव, 19 फेब्रुवारी 2021 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  
  • स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, 19 फेब्रुवारी 2021:  नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी 11:57 वाजता पाच एप्रिल 2021 च्या सोन्याचा वायदा भावात 0.28 टक्के म्हणजे 29 रुपयांची घट होऊन प्रती 10 ग्रॅम 45,997 रुपयांवर ट्रेंड करत होता. मागील सत्रात एप्रिल करारासाठी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,126 रुपये होती. त्याच वेळी, जून 2021 मध्ये, डिलीव्हरी सोन्याचे भाव 130 रुपये  म्हणजेच 0.28 टक्क्यांच्या घटीसह प्रति 10 ग्रॅम 46,165 रुपयांवर होते. त्याचबरोबर गुरूवारी जूनच्या कराराची सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,295 रुपये होती.  


वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)   

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारीचांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.  एमसीएक्सवर मार्च 2021 च्या चांदीचा भाव सकाळी 12:09 वाजता 503  रुपये म्हणजे  0.73  टक्के घटीसह  67,991   रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.   मागील सत्रात चांदीची किंमत मार्च करारासाठी 68,162 रुपये प्रतिकिलो होती. त्याचबरोबर मे २०२१ च्या चांदीचा दर 461 म्हणजे 0.66 टक्क्यांच्या घटीसह 69,170 रुपये प्रतिकिलो होता.  गेल्या सत्रात चांदीची किंमत 69,631 रुपये प्रति किलोग्रॅम होती. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव  (Gold Price) 3.70  डॉलर म्हणजे 0.21 टक्के घटीसह 1,771.30  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 2.94डॉलर  म्हणजे  0.17  टक्के घटीसह 1772.73 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  अखेरच्या दिवशी शुक्रवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी मे, 2021 वायदा भाव 0.13 डॉलर म्हणजे  0.47 टक्के घटीसह 26.99 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव स्थिर होते. चांदीचा भाव स्पॉट मार्केटमध्ये  0.15 डॉलर म्हणजे 0.56 टक्क्यांनी घसरून 26.88 डॉलर प्रति औंस झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी