सोने चांदी भाव, २० जुलै २०२०: सोनं प्रचंड महागलं, रेकॉर्डब्रेक दरवाढ; झटपट पाहा आजचा भाव

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Jul 21, 2020 | 15:28 IST

सोने चांदी भाव, २० जुलै २०२०: सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक एकदा बदल झाले आहेत. जाणून घ्या मुंबई, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, लातूर, बारामती या ठिकाणचे सोन्याचे भाव.

Gold Rate
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सोने-चांदी झाले महाग
  • २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रचंड मोठी वाढ
  • जाणून घ्या काय आहे सोनं-चांदीचा भाव 

सोने चांदी भाव, २० जुलै २०२०: सोने-चांदीच्या भावात (Gold-Silver Rate) २० जुलै २०२० रोजी बरीच वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. कारण वायदा बाजारात सोन्याच्या किंमती आणखी वाढल्या आहेत. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात (Gold Rate) वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,९७० रुपये प्रति १० ग्रॅमवर होता. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देखील सोन्याच्या भाव एवढाच होता. मात्र असं असलं तरी २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रचंड मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. २४ कॅरेट सोनं हे तब्बल २३८० रुपयांनी महागलं आहे. त्यामुळे सोन्याचा दर ५१,३४० हजार प्रति १० ग्राम एवढा झाला आहे. 

२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे नेमके दर किती? 

काल (१९ जुलै) २२ कॅरेट सोन्याच्या भाव ४७,९६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. ज्यामध्ये १० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २२ सोन्याचा दर ४७,९७० रुपये एवढा आहे. मात्र, २४ कॅरेट सोन्याच्या दरात भरमसाठ आणि रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. काल २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८९६० रुपये एवढी होती. तब्बल २३८० रुपयांची वाढ झाली असून आता सोन्याचा दर ५१,३४० रुपये एवढी झाली आहे.

मुंबईतील सोने-चांदीचा भाव

मुंबईत देखील सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold Rate) २३८० रुपयांनी वाढून ५१,३४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव (22 Carat Gold Rate) ४७,९७० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. तर चांदीच्या दरातही १० रुपयांनी  वाढ झाली आहे त्यामुळे चांदीचा भाव (Silver Rate) ५२,९२० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर 

शहर २० जुलै २०२०चा दर १९ जुलै २०२०चा दर 
मुंबई ५१ हजार ३४०   ४८ हजार ९६० 
पुणे  ४८ हजार ९७०  ४८ हजार ९६० 
जळगाव  ४८ हजार ९७० ४८ हजार ९६०
कोल्हापूर ५१ हजार ३४० ४८ हजार ९६०
लातूर ४८ हजार ९७० ४८ हजार ९६०
सांगली ४८ हजार ९७० ४८ हजार ९६०
बारामती  ४८ हजार ९७० ४८ हजार ९६०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर २० जुलै २०२०चा दर १९ जुलै २०२०चा दर 
मुंबई ४७ हजार ९७०   ४७ हजार ९६०
पुणे  ४७ हजार ९७० ४७ हजार ९६०
जळगाव  ४७ हजार ९७० ४७ हजार ९६०
कोल्हापूर ४७ हजार ९७० ४७ हजार ९६०
लातूर ४७ हजार ९७० ४७ हजार ९६०
सांगली ४७ हजार ९७० ४७ हजार ९६०
बारामती  ४७ हजार ९७० ४७ हजार ९६०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर 

शहर २० जुलै २०२०चा दर १९ जुलै २०२०चा दर 
मुंबई ५२ हजार ९२०  ५२ हजार ९१०
पुणे  ५२ हजार ९२० ५२ हजार ९१०
जळगाव  ५२ हजार ९२० ५२ हजार ९१०
कोल्हापूर ५२ हजार ९२० ५२ हजार ९१०
लातूर ५२ हजार ९२० ५२ हजार ९१०
सांगली ५२ हजार ९२० ५२ हजार ९१०
बारामती  ५२ हजार ९२० ५२ हजार ९१०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी