सोने चांदी भाव, 20 नोव्हेंबर 2020 : सलग पाच दिवस सोने स्वस्त, चांदी महागली, चेक करा 20 नोव्हेंबरचा भाव

Gold and Silver Rate |   स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  

gold and silver rate 20 November 2020
सोने चांदी भाव, 20 नोव्हेंबर 2020 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.
  •  एमसीएक्सवर सकाळी डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सकाळी 0.3 टक्के वाढली
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  अखेरच्या दिवशी शुक्रवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.  

Gold Price , सोने चांदी भाव, २० नोव्हेंबर २०२०:  नवी दिल्ली :  स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स ((MCX- Multi-Commodity Exchange)वर सकाळी डिसेंबर 2020 च्या सोन्याचा वायदा भावात 0.11 टक्क्याची घट होऊन प्रती 10 ग्रॅम 50,029 रुपयांवर ट्रेंड करत होता.  

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी त्यांच्या किंमतीत वाढ  दिसली आहे.  एमसीएक्सवर सकाळी डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सकाळी 0.3 टक्क्यांच्या वाढीसह 61,690 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर, अमेरिकेत आर्थिक प्रोत्साहन पॅकेजबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या  0.2 टक्के घटीसह 1,863.21  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.22 टक्के म्हणजे 4.11  डॉलरच्या घटीसह 1,868.13 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  अखेरच्या दिवशी शुक्रवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी वायदा भावात 0.01 टक्के घटीसह 24.06  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. 

दरम्यान कोरोना संकटाचा परिणाम देखील सोन्याच्या व्यापारावर होताना दिसत आहे. कोरोनाची व्हॅक्सीनसंदर्भात बातम्या समोर येत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशादायी वातावरण आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शेअर मार्केट देखील सर्वोच्च स्तरावर आहेत. मात्र कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता जोखीम देखील वाढली आहे. अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेजबाबत अनिश्चितता कायम आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी