सोने चांदी भाव, 21 जून  2021: वायदा बाजारात सोन्याच्या दरात बदल, चांदी झाली स्वस्त , फटाफट चेक करा 21 जून

Gold and Silver Rate |   सोने आणि चांदीच्या वायदा भावात सोमवारी संमिश्र वातावरण  दिसून आले. स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी चांदीच्या किंमतीत घट  दिसली आहे.

gold and silver rate 21 June 2021 mumbai pune jalgaon kolhapur latur nashik sangli baramati
सोने चांदी भाव, 21 जून  2021  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  •  सोने आणि चांदीच्या वायदा भावात सोमवारी संमिश्र वातावरण  दिसून आले.
  • स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी चांदीच्या किंमतीत घट  दिसली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा  भावात वाढ  पाहायला मिळाली.

Gold Price ,सोने चांदी भाव, 21 जून  2021 :  नवी दिल्ली :  सोने आणि चांदीच्या वायदा भावात सोमवारी संमिश्र वातावरण  दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सकाळी 10:52  वाजता ऑगस्ट 2021 मध्ये डिलिव्हरी सोन्याचे भाव (Gold Price) 11 रुपये म्हणजे 0.02 टक्के वाढीसह 46,739 प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या सत्रात ऑगस्टच्या कराराच्या सोन्याचा दर 46,728  रुपये प्रति 10 ग्रॅम होता.  ऑक्टोबर कराराची सोन्याची किंमत  ३ रुपये म्हणजे 0.01 टक्क्यांच्या घटीसह 47,052 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या सत्रात ऑक्टोबर कॉन्ट्रॅक्टच्या सोन्याचा रेट  47,049 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 

वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market) 

दुसरीकडे,    चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी चांदीच्या किंमतीत घट  दिसली आहे.   मल्टी कमोडिटी एक्सचेंजला दुपारी दीड  वाजता 5 जुलै 2021 रोजीच्या डिलिव्हरी चांदीची किंमत 215 रुपये म्हणजे 0.32  टक्क्यांनी घटीसह  67,383  रुपये प्रती किलो झाली.  गेल्या सत्रात जुलैमध्ये डिलेव्हरीच्या चांदीचा भाव 67,598 रुपये  प्रति किलो होता. सप्टेंबर 2021 मध्ये चांदीची किंमत 0.30 टक्के म्हणजे 209 रुपयांच्या वाढीसह 68,440 रुपये प्रतिकिलो होती. याआधी गेल्या सत्रात सप्टेंबरमध्ये चांदीचा दर 68,649 रुपये होता.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा  भावात वाढ  पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 4.40 डॉलर म्हणजे 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 1,773.40  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव (Gold Price)  10.15 डॉलर म्हणजे 0.58 टक्क्यांच्या तेजीसह 1,774.31  डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी  वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   चांदीची किंमत 0.27 डॉलर म्हणजे 1.06 टक्क्यांच्या घटीसह  25.70 डॉलर प्रति औंसवर स्थिरावली.  चांदीचा हाजीर भाव 0.09 डॉलर म्हणजे 0.34 टक्क्यांच्या घटीसह 25.70 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता. 

महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रात सोन्याच्या भावात कोणताही बदल झाला नाही.  राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भाव 47,220 रुपये कायम आहे.  तर 22  कॅरेट सोन्याचा भाव 46,220 रुपये प्रति 10 ग्रॅम कायम आहे.  यासोबतच चांदीच्या भावातही गेल्या सत्राइतका आहे.  त्यामुळे चांदी 67,600 रुपये प्रति किलो स्थीर आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार २२० ४७ हजार २२०
पुणे  ४७ हजार २२० ४७ हजार २२०
जळगाव  ४७ हजार २२० ४७ हजार २२०
कोल्हापूर ४७ हजार २२० ४७ हजार २२०
लातूर ४७ हजार २२० ४७ हजार २२०
सांगली ४७ हजार २२० ४७ हजार २२०
बारामती  ४७ हजार २२० ४७ हजार २२०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४६ हजार २२० ४६ हजार २२०
पुणे  ४६ हजार २२० ४६ हजार २२०
जळगाव  ४६ हजार २२० ४६ हजार २२०
कोल्हापूर ४६ हजार २२० ४६ हजार २२०
लातूर ४६ हजार २२० ४६ हजार २२०
सांगली ४६ हजार २२० ४६ हजार २२०
बारामती  ४६ हजार २२० ४६ हजार २२०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६७ हजार ६०० ६७ हजार ६००
पुणे  ६७ हजार ६०० ६७ हजार ६००
जळगाव  ६७ हजार ६०० ६७ हजार ६००
कोल्हापूर ६७ हजार ६०० ६७ हजार ६००
लातूर ६७ हजार ६०० ६७ हजार ६००
सांगली ६७ हजार ६०० ६७ हजार ६००
बारामती  ६७ हजार ६०० ६७ हजार ६००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी