Gold Price , सोने चांदी भाव, 22 फेब्रुवारी 2021: नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात तेजी पाहायला मिळाली. सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी 11:57 वाजता पाच एप्रिल 2021 च्या सोन्याचा वायदा भावात 0.30 टक्के म्हणजे 138 रुपयांची तेजी होऊन प्रती 10 ग्रॅम 46,335 रुपयांवर ट्रेंड करत होता. या व्यतिरिक्त जागतिक बाजारात सोमवारी सुरूवातीला सोन्याच्या वायदे आणि हाजीर किंमतीत वाढ दिसून आली..
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारीचांदीच्या किंमतीत तेजी दिसली आहे. एमसीएक्सवर मार्च 2021 च्या चांदीचा भाव सकाळी 12:09 वाजता 416 रुपये म्हणजे 0.60 टक्के तेजीसह 69,428 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. त्याचबरोबर मे २०२१ च्या चांदीचा दर 401 म्हणजे 0.57 टक्क्यांच्या घटीसह 70,560 रुपये प्रतिकिलो होता. त्याचबरोबर जागतिक बाजारात सोमवारी सकाळी चांदीचे दोन्ही वायदा आणि हाजीर भाव वाढले.
सोमवारी सकाळी जागतिक पातळीवर सोन्याचे वायदे आणि स्पॉट भाव दोन्ही वाढले. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा भाव कॉमेक्सवर 0.26 टक्क्यांनी किंवा 4.70 डॉलरच्या तेजी सह 1,782.10 डॉलर प्रति औंसची पातळी असल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त, सोन्याच्या जागतिक स्पॉट किमतीची किंमत प्रति औंस 1,784.93 .3. डॉलरवर असल्याचे दिसून आले. यावेळी 0.04 टक्के किंवा 0.68 डॉलर वाढ झाली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर चांदी मार्च 2021 वायदा भाव 0.25 डॉलर म्हणजे 0.47 टक्के घटीसह 27.54 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव स्थिर होते. चांदीचा भाव स्पॉट मार्केटमध्ये 0.18 डॉलर म्हणजे 0.66 टक्क्यांनी घसरून 27.46 डॉलर प्रति औंस झाला.