सोने चांदी भाव, २२ जुलै २०२०: सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ, फटाफट चेक करा भाव

सोने चांदी भाव, २२ जुलै २०२०: सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा बदल झाले आहेत. जाणून घ्या मुंबई, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, लातूर, बारामती या ठिकाणचे सोन्याचे भाव.

Gold Rate
सोन्याच्या दरात वाढ (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • सोने-चांदीच्या भावात होतेय मोठी वाढ
  • चांदीच्या दराने ओलांडला ६०,००० रुपयांचा टप्पा 
  • पाहा काय आहेत सोने-चांदीचे भाव 

मुंबई: सोने चांदी भाव, २२ जुलै २०२०: वायदा बाजारात बुधवारी सोन्याच्या भावात (Gold Rate) मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. बुधवारी बाजार उघडताच सोन्याच्या भावात ५५८ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली. यामुळे देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव (Delhi Gold Rate) ५०,०८५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. केवळ सोन्याच्या भावातच नाही तर चांदीच्या भावात (Silver Rate) बुधवारी मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

बुधवारी एमसीएक्स (MCX)वर चांदीच्या भावात तब्बल ३,७८८ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे बुधवारी चांदीचा भाव ६१,१३० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय वायदा बाजारात (Indian Futures Market) मध्ये मंगळवारी सप्टेंबर २०१३ नंतर प्रथमच सोन्याच्या भावाने ६४,००० रुपये प्रति किलोग्रॅमचा टप्पा ओलांडला. तर आता बुधवारी तर चांदीच्या भावाने ६१ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

मुंबईतील सोने-चांदीचा भाव

बुधवारी मुंबईतील सोन्याच्या भावात ८५० रुपये प्रति १० ग्रॅम वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत २४ कॅरेट (24 Carat) सोन्याचा भाव ४९,९५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर २२ कॅरेट (22 Carat) सोन्याचा भाव ४८,७५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. बुधवारी बाजार उघडताच चांदीच्या भावात तब्बल ५००० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा भाव ६०,४०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला. तर बाजार बंद होताना थोडी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. बाजार बंद झाल्यावर चांदीच्या दरात एकूण ३५५० रुपयांची वाढ होत हा भाव ५८,९५० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला.

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ९५० ४९ हजार १००
पुणे  ४९ हजार ९५० ४९ हजार १००
जळगाव  ४९ हजार ९५० ४९ हजार १००
कोल्हापूर ४९ हजार ९५० ४९ हजार १००
लातूर ४९ हजार ९५० ४९ हजार १००
सांगली ४९ हजार ९५० ४९ हजार १००
बारामती  ४९ हजार ९५० ४९ हजार १००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ७५०  ४७ हजार ९००
पुणे  ४८ हजार ७५० ४७ हजार ९००
जळगाव  ४८ हजार ७५० ४७ हजार ९००
कोल्हापूर ४८ हजार ७५० ४७ हजार ९००
लातूर ४८ हजार ७५० ४७ हजार ९००
सांगली ४८ हजार ७५० ४७ हजार ९००
बारामती  ४८ हजार ७५० ४७ हजार ९००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५८ हजार ९५० ५५ हजार ४००
पुणे  ५८ हजार ९५० ५५ हजार ४००
जळगाव  ५८ हजार ९५० ५५ हजार ४००
कोल्हापूर ५८ हजार ९५० ५५ हजार ४००
लातूर ५८ हजार ९५० ५५ हजार ४००
सांगली ५८ हजार ९५० ५५ हजार ४००
बारामती  ५८ हजार ९५० ५५ हजार ४००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी